Lockdown: पश्चिम बंगाल सरकारने लॉक डाऊन 31 जुलै पर्यंत वाढवला; राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे ममता बॅनर्जी सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान, पश्चिम बंगालच्या (West Bengal) ममता बॅनर्जी सरकारने राज्यातील कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता लॉक डाऊन 31 जुलैपर्यंत वाढविला आहे.
गेल्या 3 महिन्यापासून देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) ने हाहाकार माजवला आहे. भारतातील कोरोना विषाणू रुग्णांची संख्या 4 लाख 56 हजारांहून अधिक झाली आहे. तर, आतापर्यंत 14 हजार 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या (West Bengal) ममता बॅनर्जी सरकारने राज्यातील कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता लॉक डाऊन 31 जुलैपर्यंत वाढविला आहे. आता 31 जुलैपर्यंत राज्यात ना रेल्वे चालणार, ना मेट्रो सेवांना परवानगी देण्यात येणार आहे. यासह शाळा व महाविद्यालयेही बंद ठेवण्यात येणार आहेत. पश्चिम बंगाल सरकारने कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा आदेश जारी केला आहे.
एएनआय ट्वीट-
Lockdown in the state extended till 31st July with certain relaxations: West Bengal Government pic.twitter.com/utW4X2u6oT
भारतामध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे समोर यायला सुरुवात झाल्यावर 24 मार्च रोजी सरकारने लॉक डाऊनचा आदेश जारी केला होता. मात्र आता त्यामधील काही नियम शिथिल केले आहेत. मात्र आता काही ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाद होत असलेली दिसून येत आहे व त्यातीलच एक पश्चिम बंगाल राज्य आहे. आता पश्चिम बंगाल सरकारने काही नियम शिथिल करत लॉक डाऊन 31 जुलैपर्यंत वाढवले आहे. मात्र या टप्प्यातील लॉकडाउन केवळ कोरोना बाधित भागातच असेल.
(हेही वाचा: कोविड-19 विरोधातील लढ्यात पीएम केअर्स निधी अंतर्गत दिले जाणार भारतात निर्मिती करण्यात आलेले 50,000 व्हेंटीलेटर)
याआधी 30 जूनपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यात आले होते. 30 जून रोजी देशव्यापी लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही संपुष्टात येत आहे, ज्याला 'अनलॉक 1' असे म्हटले जाते. दरम्यान, बंगालमध्ये कोरोना संक्रमणाचा आकडा 14,728 झाला आहे व आतापर्यंत 580 लोक मरण पावले आहेत. राज्यात सध्या 9, 218 सक्रिय प्रकरणे आहेत. याआधी चेन्नई व गुवाहाटीने असा निर्णय घेतला होता.