Lockdown Extension: 3 मे नंतर सुद्धा वाढणार लॉक डाऊन? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्र्यांनी केल्या 'या' सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी यावेळी मोदींना लॉक डाऊनचा अवधी वाढवण्यात यावा अशी विनंती केली.यानुसार, लॉक डाउनच्या अवधीत 3 मे च्या नंतरही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

PM Modi in video conference with State CMs | (Photo Credits: Twitter/@CMOMaharashtra)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशभरात 3 मे पर्यंत लॉक डाऊन (Lockdown) जाहीर केले आहे, या लॉक डाऊनचा अवधी संपण्यासाठी आता 6 दिवस शिल्लक आहेत मात्र अजूनही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा काही कमी झालेला नाही उलट मागील काही काळात झालेल्या वाढीनुसार आता कोरोनाचे तब्बल 27 हजाराहून अधिक रुग्ण भारतात आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी यावेळी मोदींना लॉक डाऊनचा अवधी वाढवण्यात यावा अशी विनंती केली.यानुसार, लॉक डाउनच्या अवधीत 3  मे च्या नंतरही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा (Amit Shah)  यांच्या सोबतच्या बैठकीत आर्थिक अडचणी, स्थलांतरित कामगारांचा मुद्दा, परदेशात व अन्य राज्यात अडकलेल्या नागरिकांचे प्रश्न सुद्धा मांडले होते. Coronavirus: 30 जून पर्यंत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही! उत्तर प्रदेश साठी योगी आदित्यनाथ यांचा मोठा निर्णय

प्राप्त माहितीनुसार, मेघालय आणि ओडिशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉक डाऊन वाढवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तर, गोवा राज्यात कोरोनाचा रुग्ण नसूनही खबरदारी म्ह्णून 3 मे नंतर राज्याच्या सीमा सील ठेवल्या जाव्यात अशी विनंती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सुद्धा या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. यानुसार, कोरोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या रेड झोन मधील राज्यात 3  मे नंतरही लॉक डाऊन जारी ठेवले जाऊ शकते तर ग्रीन झोन मधील राज्यांना काही प्रमाणात दिलासा दिला जाऊ शकतो.

पहा ट्विट

मात्र लॉकडाउन वाढवल्यास राज्यात आर्थिक व्यवस्थेत येणाऱ्या तणावाचे काय करणार असाही प्रश्न उपस्थित होतो, यावर मोदींनी भाष्य करताना "आपल्याला अर्थव्यवस्थेला आणि कोरोना विरूद्ध लढ्याला एकत्र सामोरे जायचे आहे" असे म्हंटले आहे.लॉकडाउन दरम्यान, राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत नॉन-हॉटस्पॉट्स मधील सर्व दुकानांना काम करण्यास परवानगी दिली गेली आहे. दुकानांमध्ये 50 टक्के कर्मचार्‍यांसह काम करणे, मास्क घालणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे यासारख्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे असेही सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे सद्य स्थितीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 27,892 वर पोहोचली असून 872 जणांचा मृत्यू झाला आहे तर 6185 बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now