Lockdown: कुटुंबासोबत मूळ गावी परतणाऱ्या 12 वर्षीय मुलीचा रस्त्यात मृत्यू; तेलंगना ते छत्तीसगढ पायी प्रवास बेतला जीवावर
सीएमएचओ बीजापूर यांनी म्हटले आह की, आतापर्यंत या मुलीचा शवविच्छेदन अहवाल मिळाला नाही. पण, या मुलीचा मृत्यू थकवा, अशक्तपणा आणि अतिश्रमामुळे झाला असे वाटत नाही. कदाचीत या मुलीचा मृत्यू डिहाइड्रेशन किंवा इतर एखाद्या कारमामुळे झाला असावा.
लॉकडाऊन (Lockdown) काळात आपल्या गावी रस्त्याने पायी निघालेल्या 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झालेला आहे. ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत तेलंगना (Telangana) राज्यातील पेरुर गावातून छत्तीसगढ (Chhattisgarh) राज्यातील बीजापूर जवळील आदेड या आपल्या मूळ गावी निघाली होती. दरम्यान, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे या मुलीचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला तेथून तिचे गाव अवघे 14 किलोमीटर दूर असल्याचे सांगितले जात आहे. या मुलीचा मृत्यू अतीश्रम, उपासमार आणि अशक्तपणा आदी कारमांमुळे झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोना व्हायरस संकटामुळे लॉकडाऊन असल्यामुळे देशभरातील विविध राज्यांमध्ये अनेक नागरिक अडकून पडले आहेत. हाताला काम नाही, घरात खायला अन्न नाही. रहायला जागा नाही. असलीच तर घडभाडे द्यायाल पैसे नाहीत, अशा अवस्थेत अनेक नागरिक विविध राज्यांमध्ये अडकले आहेत. त्यातच लॉकडाऊन असल्यामुळे जिल्हा, राज्य आणि देशांतर्गत वाहतूक बंद आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या मूळ गावी पायीच जाण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राप्त माहितीनुसार छत्तीसगढ राज्यातील काही कुटुंबातील 11 लोक तेलंगना राज्यात लॉकडाऊनमुळे अडकले होते. त्यामुळे या नागरिकांनी त्यांचे मूळ गाव असलेल्या बीजापूर येथली अदेडी या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. या लोकांसोबत एक 12 वर्षाची मुलगीही होती. तिचा 18 एप्रिल 2020 मध्ये रस्त्यातच मृत्यू झाला. (हेही वाचा, Coronavirus Outbreak: कोरोना रुग्णांची संख्या 18,601 वर; आतापर्यंत 590 जणांचा मृत्यू, पहा आजची आकडेवारी)
एएनआय ट्विट
सीएमएचओ बीजापूर यांनी म्हटले आह की, आतापर्यंत या मुलीचा शवविच्छेदन अहवाल मिळाला नाही.
१२ वर्षाच्या चिमुकलीने १५० किमी चालून गमावला जीव; घर जवळ येत असताना सोडले प्राण - Watch Video
पण, या मुलीचा मृत्यू थकवा, अशक्तपणा आणि अतिश्रमामुळे झाला असे वाटत नाही. कदाचीत या मुलीचा मृत्यू डिहाइड्रेशन किंवा इतर एखाद्या कारमामुळे झाला असावा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)