Bharat Ratna 2024: लालकृष्ण अडवाणी, कर्पूरी ठाकूर यांच्यासह अन्य तिघांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार भारतरत्न पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( President Droupadi Murmu) यांच्या हस्ते दोन माजी पंतप्रधान (मरणोत्तर) आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांच्यासह पाच प्रतिष्ठित व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna 2024) प्रदान करणार आहेत. दिल्ली येथे आज आज (30 मार्च) हा सोहळा पार पडणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( President Droupadi Murmu) यांच्या हस्ते दोन माजी पंतप्रधान (मरणोत्तर) आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांच्यासह पाच प्रतिष्ठित व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna 2024) प्रदान करणार आहेत. दिल्ली येथे आज आज (30 मार्च) हा सोहळा पार पडणार आहे. भारतरत्न देण्यात येणाऱ्या पाच व्यक्तिमत्त्वांमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी वगळता इतर चार- माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग (Chaudhary Charan Singh) आणि पीव्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao), प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांचा समावेश आहे. या चौघांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जाणार आहे. पीआयबी इंडियाने याबाबत आपल्या 'X' हँडलवर माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळापूर्वीच आपल्या 'X' हँडलवर पोस्ट केले होते की, आज हे सांगण्यास आनंद होत आहे की, आपले माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही. नरसिंह राव  यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव गरू यांनी विविध पदांवर भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आणि देशाची समृद्धी आणि विकास यांचा भक्कम पाया रचण्यात मोलाचा वाटा उचलला. (हेही वाचा, Bharat Ratna: चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव आणि डॉ. एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा  )

चौधरी चरणसिंग यांच्या सन्मानाची घोषणा करताना, पंतप्रधान मोदींनी X वर लिहिले, "देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते.

पीएम मोदींनी कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणाही केली होती. ही घोषणा करताना त्यांनी म्हटले होते की, सरकार एमएस स्वामिनाथन जी यांना भारतरत्न प्रदान करत आहे,. ही अत्यंत आनंदाची बाब आहे, त्यांनी आपल्या राष्ट्रासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात केलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करण्यात मोलाची भूमिका बजावली. आव्हानात्मक काळात शेतीवर अवलंबून राहणे आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले,” पंतप्रधान म्हणाले.

एक्स पोस्ट

दरम्यान, देशात सध्या लोकसभा निवडणूक 2024 चे वारे आहे. या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार जाहीर होणे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना निमंत्रण देणारे ठरते आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

KAR vs VID Vijay Hazare Trophy Final Live Streaming: कर्नाटक आणि विदर्भ यांच्यात जेतेपदाची लढाई, कोणत्या 'ओटीटी' आणि 'चॅनल'वर पाहून घेणार सामन्याच आनंद; घ्या जाणून

Who Is Priya Saroj? प्रिया सरोज कोण आहे? वय, संपत्ती आणि राजकीय पार्श्वभूमी, समाजवादी पक्षाच्या खासदाराबद्दल सर्व काही घ्या जाणून, रिंकू सिंहसोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे वृत्त

Saif Ali Khan Attack Case: रक्ताने माखलेल्या सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्या ऑटो ड्रायव्हरने सांगितली संपूर्ण कहाणी; नेमक काय घडलं? जाणून घ्या

Khel Ratna Award 2025: मनु भाकर, गुकेश डी, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार प्रदान

Share Now