Lata Mangeshkar In ICU: लता मंगेशकर Covid-19 संक्रमित; Breach Candy Hospital रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु
मंगेशकर यांची कोविड (Covid-19) चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. लता मंगेशकर यांचे वय पाहता त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्या आले आहे.
प्रख्यात गायिका लता मंगेशकर ( Lata Mangeshkar) यांनासुद्धा कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीचा फटका बसला आहे. मंगेशकर यांची कोविड (Covid-19) चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. लता मंगेशकर यांचे वय पाहता त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्या आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (Lata Mangeshkar In ICU) उपचार सुरु आहेत. त्यांची पुतणी रचना यांनी ही माहिती दिली. रचना यांनी प्रसारमध्यमे आणि लता मंगेशकर यांच्या चाहत्यांना अवाहन केले आहे की, कुटुंबाच्या वैयक्तीक बाबींचा आदर करावा. तसेच, लता मंगेशकर यांना आराम मिळावा यासाठी प्रार्थना करावी.
लता मंगेशकर या सध्या 93 वर्षांच्या आहेत. त्या आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे वृत्त येताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
लता मंगेशकर यांच्याबातब माहिती देताना रचना यांनी सांगितले की, लता मंगेशकर यांना कोविड-19 संसर्ग झाल्याची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ज्यात त्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे आढळून आले. (हेही वाचा, Lata Mangeshkar यांनी 80 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी रेडिओ साठी गायली होती 2 गाणी; ट्वीट करत रसिकांनी केलेल्या प्रेमाचे मानले आभार)
ट्विट
लता मंगेशकर यांची प्रकृती सध्या ठिक आहे. चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. केवळ सुरक्षेचा आणि खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात डॉक्टरांचे एक पथक लक्ष ठेऊन आहे, असे रचना म्हणाल्या.