Landslide On Vaishno Devi Route: कटरा येथे वैष्णोदेवी मार्गावर दरड कोसळली; पर्यायी मार्गाने यात्रा सुरू (Watch Video)

आता यात्रेला पर्यायी मार्गाने सुरुवात झाली आहे. याबाबत अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. संबंधित अधिकारी भूस्खलनाच्या ठिकाणी परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत.

Landslide On Vaishno Devi Route (फोटो सौजन्य - PTI)

Landslide On Vaishno Devi Route: जम्मूमधील दक्षिण देवरीजवळ श्री माता वैष्णो देवी (Vaishno Devi) यात्रा मार्गावर भूस्खलन (Landslide) झाल्यामुळे यात्रेकरूंना मंदिराकडे जाण्यासाठी तात्पुरता अडथळा निर्माण झाला. सध्या या भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. आता यात्रेला पर्यायी मार्गाने सुरुवात झाली आहे. याबाबत अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. संबंधित अधिकारी भूस्खलनाच्या ठिकाणी परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत.

भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला आहे. वैष्णोदेवीचे मंदिर असलेल्या त्रिकुटा टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या कटरा येथे 13 सेमी पावसाची नोंद झाली आहे. IMD नुसार, 16 ऑगस्टपर्यंत जम्मू विभागात आणखी पावसाची अपेक्षा आहे. (हेही वाचा -Wayanad Landslides: केरळच्या वायनाडमध्ये मृतांची संख्या 402 वर पोहोचली, सुमारे 170 अद्याप बेपत्ता, 8 व्या दिवशी बचाव कार्य सुरू)

आज सकाळी जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात ढगफुटीमुळे अचानक पूर आला आणि अनेक भाग पाण्याखाली गेले. मात्र, या भागात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. श्रीनगर हवामान केंद्राने जम्मू-काश्मीरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 15 ऑगस्ट रोजी जम्म-काश्मीरच्या बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. (हेही वाचा -Roads Block in Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत; भूस्खलन, पूरामुळे 288 रस्ते बंद)

पहा व्हिडिओ - 

IMD नुसार, पुढील चार ते पाच दिवसांत जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 14 आणि 15 ऑगस्ट रोजी पंजाब, हरियाणा-चंदीगड आणि पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, जम्मू विभागात 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान असेच हवामान राहण्याची हवामान विभागाने वर्तवली आहे.