Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली, Bihar Assembly Election 2020 मुळे मानसिक तणाव वाढला, डायलिसिस करावे लागण्याची शक्यता
त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर मानसिक तनाव आहे. बिहार विधानसभा निवडणूक विषयावरुन ते सातत्याने चिंतेत असतात. ते आपल्या नेहमीच्या आहारावरही लक्ष देत नसल्याचे सांगितले जात आहे.
बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली. सर्व ठिकाणांहून एक्झिट पोल्सचे अंदाज येऊ लागले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय जनता दल (RJD) पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे वृत्त आहे. रिम्स रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लालू प्रसाद यादव यांची प्रकृती (Lalu Prasad Yadav's Health Deteriorates) खालावली आहे. मधुमेहाचा आजार असल्याने लालूंच्या क्रियेटनीन पातळीत अचानक वाढ झाली आहे. रिम्समध्ये लालूंवर उपचार करत असलेल्या डॉ. उमेश प्रसाद यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार क्रियेटनीन पातळी अशीच वाढली तर यायलिसिस करण्याची आवश्यकता भासू शकते. रिम्स प्रशासनाकडून याबाबतची माहिती हायकोर्टाला देण्यात आली आहे. हायकोर्टाने रिम्स प्रशासनाकडून लालू प्रसाद यादव यांच्या आरोग्याबाबत अहवाल मागवला होता.
रिम्समध्यील तज्ज्ञांच्या मते लालू प्रसाद यादव यांची किडणी केवळ 25 टक्केच कार्यरत आहे. अलिकडील काही दिवसांपासन किडणीच्या कार्यक्षमतेमध्ये 10 टक्के घट झाल्याचे पाहायला मिळाले. जर यात आणखी 10 ते 12 टक्के आणखी घट झाली तर तातडीने डायलिसीस करण्याची आवश्यकता भासू शकते.
लालू प्रसाद यादव जेव्हा रिम्समध्ये दाखल झाले होते तेव्हा त्यांची किडणी 3बी स्टेजमध्ये होती. आता ती स्टेज 4 मध्ये पोहोचली आहे. दोन वर्षांपर्यंत इन्सुलीन आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली लालूंच्या किडणीने चांगले काम केले होते. परंतू आता पुन्हा एकदा त्यांची प्रकृती ढासळू लागली आहे. रिम्सच्या डॉक्टरांनुसार जर कोरोना व्हायरस संक्रमनाचा धोका नसता तर लालू प्रसाद यादव यांना उपचारांसाठी एम्समध्ये दाखल करता येऊ शकले असते. (हेही वाचा, Bihar Assembly Elections 2020 Exit Polls Live Streaming on Aaj Tak: येथे पाहा आजतकच्या एक्झिट पोलचे निकाल)
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृती ढासळण्याचे कारण मानसिक तनाव हेही असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर मानसिक तनाव आहे. बिहार विधानसभा निवडणूक विषयावरुन ते सातत्याने चिंतेत असतात. ते आपल्या नेहमीच्या आहारावरही लक्ष देत नसल्याचे सांगितले जात आहे.