Priyanka Gandhi Vadra Arrested: 'वॉरंट दाखवा मगच अटक करा' उत्तर प्रदेश पोलिसांवर संतापल्या प्रियंका गांधी
लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri Violence) येथे झालेल्या हिंसाचारात 8 लोक मारले गेले. येथील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) लाखीमपूर खीरी येथे पोहोचणार होत्या. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) त्यांना हरगांव येथे ताब्यात (Priyanaka Gandhi Arrested) घेतले.
लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri Violence) येथे झालेल्या हिंसाचारात 8 लोक मारले गेले. येथील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) लाखीमपूर खीरी येथे पोहोचणार होत्या. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) त्यांना हरगांव येथे ताब्यात (Priyanaka Gandhi Arrested) घेतले. लाखीमपूरा खीरी येथे जाण्यासाठी प्रियंका गांधी मध्यरात्री 1 वाजता रवाना झाल्या होत्या. प्रियंका गांधी यांना हरगांव येथून पोलिसांनी ताब्यत घेतल्याची माहिती उत्तर प्रदेश काँग्रेसने ट्विटरद्वारे दिली. काँग्रेसने ट्विटमध्ये आरोप केला आहे की, 'प्रियंका गांधी यांना सीतापूर पोलीस लाईन घेऊन जात आहे. प्रियंका गांधी यांच्यासोबत पोलिसांनी अवमानकारक वर्तन केले. त्यांना धक्काबुक्की झाली'. प्रियंका गांधी यांनी पोलिसांना विरोध 'आगोदर वॉरंट दाखवा आणि मगच अटक करा' अशी ताठर भूमिका घेत उत्तर प्रदेश पोलिसांना जाब विचाराला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करुन म्हटले आहे की, 'प्रियंका, मला माहिती आहे. तुम्ही मागे हटणार नाही. तुमची हिम्मत पाहून ते घाबरले आहेत. न्यायाची अहिंसक लडाई आम्ही देशाच्या अन्नदात्याला सोबत घेऊन जिंकाल.' पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियंका गांधी सकाळी सहा वाजता लखीमपूर खीरी येथील सीमेवर पोहोचल्या. दरम्यान उत्तर प्रदेश पोलीस त्यांना ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी रविवारी लखीमपूर खीरी येथे दौरा केला. या दौऱ्याला विरोध करताना भडकलेल्या हिंसेत जखमी झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी काँग्रेस महासचिव प्रियंका गाधी निघाल्या होत्या. (हेही वाचा, Uttar Pradesh: केंद्रीय मंत्री Ajay Mishra यांचा मुलगा Ashish Mishra ने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप; 3 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी)
ट्विट
काँग्रेस कार्यरर्त्यंनी सीतापूर पोलीस लाईनच्या दुसऱ्या तुकडीच्या प्रवेशद्वाराबाहेर जोरदार आंदोलन केले. कार्यकर्त्यांने गेटच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीसांमध्ये जोरदार धरपकड झाली. काँग्रेस कार्यकर्ता सातत्याने पोलिसांच्या तुकडीसमोर घोषणाबाजी आणि आंदोलन करत आहेत.
ट्विट
प्रियंका गांधी यांनी अटक होण्यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांना चांगलाच जाब विचारला. प्रियंका गांधी यांनी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली. मला का ताब्यात घेतले जात आहे. का अटक केली जात आहे. मला आगोदर अटक वॉरंट का दाखवले जात नाही. प्रियंका गांधी यांनी पोलिसांना सांगितले की, तुम्ही माझ्यासोबत जे वर्तन केले तो छेडछाड आणि मारहाणीचे प्रकरण होऊ शकते. अटक करण्याबाबतही प्रियंका यांनी पोलिसांना आव्हान दिले. त्यांनी पोलिसांना आगोदर वरिष्ठ अधिकारी अथवा मंत्र्यांकडून वॉरंट ऑर्डर घेऊन येण्याबाबत सांगितले. त्यांनी आपण कायदा जाणत असल्याचे सांगितले.उत्तर प्रदेश सरकार भलेही कायदा पाळत नसेल. परंतू,देशात कायदा चालतो, असेही प्रियंगा गांधी म्हणाल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)