Kuwait Fire: कुवेतमधील आगीच्या घटनेत मृतांपैकी 12 केरळ नागरिकांची ओळख पटली, राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज तातडीने रवाना
केरळ सरकारकडून आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज आणि एक IAS अधिकारी कुवेतला रवाना होणार आहेत.
Kuwait Fire: केरळ सरकारने गुरुवारी कुवेत(Kuwait) मधील मंगफ(Mangaf) भागात लागलेल्या आगीच्या घटनेत प्राण गमावलेल्या राज्यातील 12 लोकांची ओळख पटवली आहे. केरळमधील 21 नागरिकांनी आगीत जीव गमावन्याचे सांगण्यात येत आहे. तर मृतांमध्ये एकूण 40 भारतीयांचा समावेश आहे. केरळ सरकारकडून आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज आणि एक IAS अधिकारी कुवेतला रवाना होणार आहेत. गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख आणि जखमींना एक लाखांची मदत जाहीर केली आहे. (हेही वाचा:Kuwait Building Fire: कुवेतमधील मंगफ परिसरात भीषण आग; अनेक भारतीयांसह 48 लोकांचा मृत्यू, 30 हून अधिक गंभीर जखमी (Watch Video)
कुवेत मधील मंगफ परिसरात बुधवारी एका रहिवाशी इमारतीला आग (Fire) लागली. या आगीत जवळजवळ 48 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये मुख्यत्वे भारतीयांचा समावेश आहे. या अपघातामध्ये 30 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आगीपासून वाचण्यासाठी अनेकांनी इमारतीवरून उड्या मारून पळण्याचा प्रयत्न केला पण यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण भाजले गेले. तर अनेकजण धुरामुळे गुदमरले गेले.भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास आगीची घटना घडली. मिळालेल्या माहितीवरून, तळमजल्यावरील स्वयंपाकघरात लागलेली आग वेगाने 6 मजली इमारतीत पसरली होती.