देशाच्या Economic Advisor पदी कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांची नियुक्ती

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे कृष्णमृती सुब्रह्मण्यम यांची देशाचे नवे आर्थिक सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे.

कृष्णमृती सुब्रह्मण्यम (फोटो सौजन्य- ट्विटर)

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे कृष्णमृती सुब्रह्मण्यम (Dr.KrishnamurthySubramanian) यांची देशाचे नवे आर्थिक सल्लागार (Economic Advisor) म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाल तीन वर्षांचा असणार आहे. तर अरविंद सुब्रह्मण्यम यांचा पदभार कृष्णमृती यांना सोपविण्यात आला आहे.

अरविंद सुब्रह्मण्यम (Arvind Subramanian)  यांनी जुलै महिन्यामध्ये व्यक्तिगत कारणास्तव त्यांचा पदाचा राजीनामा दिला होता. नवे आर्थिक सल्लागार कृष्णमृती हे सध्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस येथे फायनान्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच जगातील उच्च स्तरीय बँकींग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इकॉनॉमिर पॉलिसी तज्ज्ञांमध्ये त्यांची गणना केली जाते.

कृष्णमृती यांनी करिअरच्या सुरुवातीला न्यूयॉर्कमधील जेपी मॉर्गन या कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम केले. त्यानंतर आयसीआयसीआयच्या एलाइट डिरेव्हेटिव्हज गटात व्यवस्थापक म्हणून पदभार सांभाळला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now