Kota Suicide: कोटा येथे परीक्षेच्या काही तासांतच 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या, यावर्षी एकूण 24 जणांनी संपवले जीवन
कोटा येथे रविवारी दोन NEET परीक्षार्थींनी आत्महत्या केल्याने यावर्षी एकूण 24 विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याने शहरात खळबळ माजली आहे.
राजस्थानच्या कोटा शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे सत्र काही केला थांबताना दिसत नाही आहे. कोटा येथे रविवारी दोन NEET परीक्षार्थींनी आत्महत्या केल्याने यावर्षी एकूण 24 विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याने शहरात खळबळ माजली आहे. रविवारी 18 वर्षीय अविष्कार शंबाजी कासले आणि द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आदर्श राज अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अविष्कारने कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली होती, त्याची चाचणी लिहिल्यानंतर दुपारी 3.15 वाजता ही घटना घडली. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (हेही वाचा - Sangli Food Poisoning: सांगली जिल्ह्यातील उमदी येथे आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा)
काही तासांनंतर, मूळचा बिहारचा रहिवासी असलेला आदर्श राज, ज्याने चाचणी देखील लिहिली होती, त्याने संध्याकाळी 7 च्या सुमारास त्याच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून घेतला. असे मानले जात होते की त्याला परीक्षेत कमी गुण मिळण्याची भीती वाटत होती आणि म्हणूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले.
मूळचा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आणि बारावीत शिकणारा अविष्कार तीन वर्षांपासून शहरात NEET UG ची तयारी करत होता आणि तळवंडी परिसरात आजी-आजोबांसोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याचे पालक महाराष्ट्रातील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने पुष्टी केली की कोचिंग संस्थेच्या सहाव्या मजल्यावरून पडून अविष्कारचा मृत्यू झाला.