Coronavirus In India: कोकण रेल्वे सह भारतीय रेल्वेच्या पॅसेंजर ट्रेन्स सेवा 31 मार्च पर्यंत खंडीत
31मार्च पर्यंत सरकारने देशातील भारतीय रेल्वेची मेल, एक्सप्रेस सह पॅसेंजर गाड्यांची वाहतूक 31 डिसेंबर पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोकण रेल्वेचादेखील समावेश आहे.
भारतामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी आणि देशामध्ये कोरोना व्हायरसचं कम्युनिटी इंफेक्शन वाढवण्याचा धोका रोखण्यासाठी आता 31मार्च पर्यंत सरकारने देशातील भारतीय रेल्वेची मेल, एक्सप्रेस सह पॅसेंजर गाड्यांची वाहतूक 31 डिसेंबर पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोकण रेल्वेचादेखील समावेश आहे. त्यामुळे 31 मार्च पर्यंत भारतीयांना रेल्वे सेवेच्या माध्यमातून देशात प्रवास करता येऊ शकत नाही. सध्या देशामध्ये वाढता कोरोनाचा धोका पाहता सरकारने हे एक मोठे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक गर्दी किंवा प्रवास टाळण्याचं आवाहन सरकार आणि आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सध्या देशात 341 कोरोना बाधित रूग्ण असून सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहे. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 74 वर पोहचला आहे. Janata Curfew निमित्त सोशल मीडियावर मेसेजसह WhatsApp Stickers, Images चा पाऊस; घरीच सुरक्षित राहत Coronavirus Chain मोडण्यास मदत करण्याचं आवाहन.
भारतामध्ये परदेशातून येणार्या नागरिकांमधून कोरोना संसर्ग झालेले रूग्ण अधिक आहेत. तर कोरोनाची लक्षणं नसलेले आणि सेल्फ क्वॉरंटाईनचा सल्ला दिलेले भारतीय मोकाट एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास करत असल्याच्या अनेक घटना मागील 2-4 दिवसांत समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून कडक पावलं उचलत आता देशातील रेल्वेसेवा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. मात्र देशांर्गत महत्त्वाच्या वस्तूंच्या ने-आण करण्यासाठी काही ट्रेन्स धावणार आहेत.
पियुष गोयल यांचे ट्वीट
Strengthening precautions against COVID-19, Railways has decided that no passenger train will run up to 31st March.
Let us work together as #IndiaFightsCorona pic.twitter.com/374b0V5sD3
— Piyush Goyal (@PiyushGoyal) March 22, 2020
दरम्यान आज 22 मार्च दिवशी कोरोनाचा विळखा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. यामध्ये सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पंतप्रधानांनी पुढील काही दिवस घरातील ज्येष्ठ नागरिक आणि मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. त्यांना बाहेर पडायला देऊ नका आणि कोरोना व्हायरसपासून सुरक्षित ठेवा असा सल्ला देण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2020 01:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

