IPL Auction 2025 Live

Pregnant Dog Killed: गर्भवती कुत्रीची हत्या, विकृत हास्य करत आरोपींचे कृत्य; दिल्ली येथे चौघांना अटक

एका गर्भवती कुत्रीला बेदम मरहाण करत तिची हत्या केलेप्रकरणी पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे. घटना न्यू फ्रेंड्स कॉलनी परिसरातील आहे. यापूर्वी 20 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून तपास सुरू केला होता. कुत्रीला मारहाण करताना ती वेदणेने तळमळत होती आणि हे चौघे विकृतपणे हसत होते.

Pregnant Dog | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

दिल्ली पोलिसांनी 4 तरुण विद्यार्थ्यांना अटक केली आहे. एका गर्भवती कुत्रीला बेदम मरहाण करत तिची हत्या केलेप्रकरणी पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे. घटना न्यू फ्रेंड्स कॉलनी परिसरातील आहे. यापूर्वी 20 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून तपास सुरू केला होता. कुत्रीला मारहाण करताना ती वेदणेने तळमळत होती आणि हे चौघे विकृतपणे हसत होते. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना घडताना दिसते. घटनेत कुत्री प्रत्यक्ष दिसत नसली तरी आरोपींचे कृत्य आणि कुत्र्याचे वेदणेने ओरडणे स्पष्ट ऐकू येत आहे. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्याला तिला मारण्यासाठी प्रोत्साहित केले

अटक करण्यात आलेले सर्व विद्यार्थी हे डॉन बॉस्को टेक्निकल इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी बेसबॉल बॅट, लाकडी दांडके आणि लोखंडी रॉड घेऊन जाताना दिसत होते. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी बेशुद्ध कुत्र्याला मोकळ्या मैदानात ओढताना दिसत आहे. गरोदर कुत्र्याला मारहाण करून शेतात गाडल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा, Rape on Dog: मुंबईमध्ये फूड डिलिव्हरी बॉयचा कुत्र्यावर बलात्कार; व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून अटक)

दरम्यान, कुत्र्याला मारहाण करताना विद्यार्थी हसताना दिसत आहेत. गरोदर मातेला (मादीला) मारहाण करतानाची घटना हसत पाहणे क्रूरपणाचे आहे. अशा बघ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी प्राणीमीत्र करत आहेत.

मूक्या प्राण्यांसोबत विकृत कृत्य केल्याच्या घटना या आधीही अनेकदा उघडकीस आल्या आहेत. या आधी पुण्यातही एक अशीच घटना घडली होती. पुण्यातील एका परिसरात भटक्या कुत्र्याच्या डोळ्यात लोखंडी सळी घालून त्याला अंध करण्यात आले होते. तर दिल्लीत एका विकृत व्यक्तीने कुत्र्याच्या पाठीला गॅस फुगे बांधून त्याला हवेत सोडले होते. आणखी एका घटनेत कुत्र्याच्या शेपटीला फटाक्यांचा सर बांधून तो पेटवून देण्यात आला होता. या घटनांवेळीही प्राणीमित्रांनी जोरदार आवाज उठवला होता.