सर्वात Healthy राज्यांमध्ये केरळने मारली बाजी, युपी शेवटच्या स्थानी; महाराष्ट्राचा 3 रा नंबर (संपूर्ण यादी)
या रँकिंगच्या माध्यमातून नीती आयोगाने देशातील सर्वात मोठ्या ते सर्वात लहान राज्ये, युनियन टेरिटरी मध्ये आरोग्याची काय स्थिती आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
देशभरातील राज्ये आरोग्य स्तरावर नेमकी कुठे आहे, याची तपासणी करत नीती आयोगाने (NITI Aayog) स्टेट हेल्थ रँकिंग (Healthy States Ranking) जारी केले आहे. या रँकिंगच्या माध्यमातून नीती आयोगाने देशातील सर्वात मोठ्या ते सर्वात लहान राज्ये, युनियन टेरिटरी मध्ये आरोग्याची काय स्थिती आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पुन्हा एकदा केरळने (Kerala) बाजी मारली आहे. केरळ हे देशातील क्रमांक एकचे हेल्दी राज्य ठरले आहे. तर बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांना या यादीमध्ये सर्वात खालचे स्थान मिळाले आहे. देशातील सर्वात हेल्थी राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा तिसरा नंबर लागला आहे. तर आंध्रप्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे.
यापूर्वी नीति आयोगाने फेब्रुवारी 2018 मध्ये अशीच एक यादी जारी केली होती, तेव्हाही केरळनेच बाजी मारली होती. केरळ, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचे ओव्हरऑल प्रदर्शन चांगले असल्याचे दिसून आले आहे. तर हरियाणा, राजस्थान, आणि झारखंड यांनी पूर्वीपेक्षा चांगले प्रदर्शन केले आहे. लहान राज्यांपैकी मिजोरम, मणिपुर आणि मेघालय यांचेही ओव्हरऑल चांगरी कामगिरी राहिली आहे. तर, त्रिपुरा, मणिपूर आणि मिझोरमचे प्रदर्शन पूर्वीपेक्षा चांगले झाले. (हेही वाचा: आता लघवीचा रंग आणि वासावरून ओळखा कसे आहे तुमचे आरोग्य)
संपूर्ण यादी -
केरळ
आंध्र प्रदेश
महाराष्ट्र
गुजरात
पंजाब
हिमाचल प्रदेश
जम्मू-काश्मीर
कर्नाटक
तमिळनाडु
तेलंगाना
पश्चिम बंगाल
हरियाणा
छत्तीसगड
झारखंड
आसाम
राजस्थान
उत्तराखंड
मध्य प्रदेश
ओडिशा
बिहार
उत्तर प्रदेश
याबाबत बोलताना, आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल म्हणाले, ‘आरोग्य क्षेत्रामध्ये बरेच काम करायची गरज आहे. सुधारणेसाठी स्थिर प्रशासन, महत्त्वपूर्ण पदे भरणे आणि आरोग्य सुविधांसाठी असणारे बजेट वाढवणे गरजेचे आहे.’