Kerala Convention Centre Blast: कोचीच्या रहिवाशाने स्वीकारली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटाची जबाबदारी; पोलिसांसमोर आत्मसमर्पण

शाह यांनी एनआयए आणि एनएसजीच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

Multiple Explosions Rock Kerala Prayer Meeting (Photo Credits: X/@MeghUpdates)

केरळमधील (Kerala) एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी सकाळी भीषण स्फोट झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. आता या प्रकरणी कोचीमधील एका व्यक्तीने केरळ पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून, त्याने कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.

केरळचे एडीजीपी (कायदा व सुव्यवस्था) एमआर अजित कुमार यांनी याबाबत माहिती दिली. डोमिनिक मार्टिन असे या व्यक्तीचे नाव आहे. सूत्रांनी सांगितले की, तो माणूस स्वतःहून पुढे आला आणि त्याने त्रिशूर जिल्ह्यातील कोडकारा पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. या व्यक्तीची आणि प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास सुरु असल्याने कुमार यांनी सांगितले. ज्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बॉम्बस्फोट झाले तेथे तीन दिवसीय धार्मिक परिषद सुरू होती. बॉम्बस्फोटासाठी 'इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस' म्हणजेच आयईडीचा वापर करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्फोटके टिफिन बॉक्समध्ये लपवून ठेवली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सभेसाठी अनेक लोक जमले असताना हा स्फोट झाला. पहिला स्फोट सकाळी नऊच्या सुमारास झाला. पुढच्या काही मिनिटांत आणखी एक स्फोट झाला. या घटनेच्या तपासासाठी एनआयए आणि एनएसजीची टीम केरळला रवाना झाली आहे. केरळचे डीजीपी डॉ शेख दरवेश यांनी सांगितले की, आज सकाळी 9:40 च्या सुमारास जामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटरमध्ये स्फोट झाला, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. सध्या 52 जखमींवर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा: Rajasthan Accident: हनुमानगढ जिल्ह्यात ट्रक आणि कारच्या धडकेत भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी बोलून बॉम्बस्फोटानंतर राज्यातील परिस्थितीवर चर्चा केली. शाह यांनी एनआयए आणि एनएसजीच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पिनाराई विजयन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून, उद्या सकाळी 10 वाजता सचिवालयातील मुख्यमंत्री कॉन्फरन्स हॉलमध्ये सर्वपक्षीय बैठक होणार आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, 52 लोकांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif