Rajasthan Accident: हनुमानगढ जिल्ह्यात ट्रक आणि कारच्या धडकेत भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
राजस्थानमधील हनुमानगढ जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. त्यात एकाच कुटुंबातील 7 सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Rajasthan Accident: राजस्थानमधील हनुमानगढ जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. त्यात एकाच कुटुंबातील 7 सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे जिल्ह्यात मोठी शांतता पसरली आहे. नोरंगदेसर गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच हनुमानगढचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उशिरा नोरंगदेसर गावाजवळ शनिवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूकसेवा विस्कळीत झाली
मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हरटेक करताना कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.या अपघातात कारमध्ये बसलेले कुटुंबातील आई, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडांचा मृत्यू झाला. तर आणखी दोन लहान मुले गंभीर जखमी झाले आहे. कार मधील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना त्यांना जवळच्या रुग्णालयता दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
अपघाच इतका भीषण होता की, या घटनेच कारचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार मधील अडकलेल्या मृतांना बाहेर काढण्यात आले. दोन मुलांना रुग्णालयता दाखल करण्यात आले त्यांच्या प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहे. कुटुंबातीला सदस्यांना या घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत्यू झालेले सर्वजण नोरंगदेसर गावचे आहेत
(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2023 09:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

