BJP प्रदेशाध्यक्षावर गुन्हा दाखल, महिला नेत्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण
सीपीआयएम (CPIM Police) पक्षाच्या महिला नेत्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केले प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
केरळ भाजप प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्र (Kerala BJP President, K Surendran) यांच्या विरोधात केरळ पोलिसांनी (Kerala BJP President, K Surendran) गुन्हा दाखल केला आहे. सीपीआयएम (CPIM Police) पक्षाच्या महिला नेत्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केले प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सीपीआय(एम) नेत्या आणि माजी खासदार सीएस सुजाता यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.
के सुरेंद्रन पोलीसांनी भारतीय दंड संहगिता कलम 354 ए (लैंगिक छळ) आणि 509 (एखाद्या महिलेच्या शिष्टाचाराचा अपमान करण्याच्या हेतूने शब्द, हावभाव किंवा कृती) अन्वये छापणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कलम 354 A अंतर्गत गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे, तर कलम 509 नुसार कमाल तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
के सुरेंद्रन यांनी रविवारी थ्रिसूर येथे आयोजित केलेल्या महिला मोर्चाच्या कार्यक्रमादरम्यान, सीपीआय(एम) च्या महिला नेत्यांविरुद्ध शरीराला वादग्रस्त आणि वर्णद्वेषाचा समावेश असलेली अपमानास्पद टिप्पणी करून वादाला तोंड फोडले होते. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा सीपीआय(एम) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी निषेध केला.
डाव्या पक्षाने त्यांच्या वक्तव्याला "दुर्भाग्यवादी" म्हणून संबोधले होते. विरोधी पक्षनेते व्ही डी साठेसन यांनी के सुरेंद्रन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि माफी मागावी अशी मागणी केली.