केरळमध्ये Coronavirus चं निदान झालेल्या तरूणीची प्रकृती स्थिर; अजून एक रूग्ण Isolation Ward मध्ये दाखल; आरोग्यमंत्री शैलजा यांची माहिती

तर आज (31 जानेवारी) केरळ मधील Thrissur General Hospital मध्ये अजून एका रूग्णाला दाखल करण्यात आले आहे.

Kerala Health Minister KK Shailaja (Photo Credits: ANI)

चीनमध्ये थैमान घालणारा कोरोना वायरस आता भारतामध्ये पसरू नये यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून विशेष काळजी घेतली जाणार आहे. काल (30 जानेवारी) भारतामध्ये पहिल्या कोरोना व्हायरासची लागण झालेल्या रूग्णाच निदान करण्यात आलं आहे.  तर आज (31 जानेवारी) केरळ मधील Thrissur General Hospital मध्ये अजून एका रूग्णाला दाखल करण्यात आले आहे. संबंधित रूग्णांची  प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले आहे. केरळच्या आरोग्यमंत्री शैलजा (Kerala Health Minister KK Shailaja) यांनी  मीडियाला याबाबत माहिती दिली. novel coronavirus (2019-nCoV)या जीवघेण्या विषाणूचं निदान झाल्यानंतर त्या रूग्णाला Thrissur Medical College च्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.  केरळ मध्ये 15 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान त्यापैकी 9 जण आयसोलेशन वॉर्डमध्ये आहेत. भारतात कोरोना व्हायरसचा शिरकाव, केरळ येथे Coronavirus चा पहिला रुग्ण आढळला

केरळमध्ये Thrissur परिसरात भारतातील पहिल्या कोरोना वायरसचं निदान झालेल्या रूग्णाला दाखल करण्यात आलं आहे.दरम्यान ही रूग्ण एक तरूणी असून ती चीनमधीन वुहान शहरातून भारतामध्ये पतरली आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. तरूणी वर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असून उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे.

ANI Tweet

आज (31 जानेवारी) जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता ग्लोबल हेल्थ इमरजन्सी (global health emergency)जाहीर करण्यात आली आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे 170 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 7800 रूग्ण बाधित आहेत. जगभरातील 20 विविध देशांमध्ये कोरोना वायरसची लागण झाली आहे. चीन सोबत हॉंग कॉंग, मकाऊ, तायवान, थायलंड, सिंगापूर, व्हिएतनाम, नेपाल, कॅनडा, युएई, फिनलॅण्ड, जपान या देशांमध्ये कोरोना वायरस बाधित रूग्ण आढळले आहेत. आता भारताकडूनही वुहान शहरातील भारतीयांनासाठी एअर इंडियाकडून विशेष फ्लाईट रवाना केले जाणार आहे.