Metal Nut stucks in Man’s Genitals: त्याच्या गुप्तांगात अडकला धातूचा नट, डॉक्टरांनी अग्निशमन दलाकडे मागितली मदत

Health News: केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी एका माणसाच्या गुप्तांगात अडकलेला 1.5 इंचाचा धातूचा नट काढण्यात डॉक्टरांना मदत केली. त्या माणसाने असा दावा केला की तो बेशुद्ध असताना अज्ञात व्यक्तींनी तो त्याच्या गुप्तांगात सरकवला.

Medical Emergency | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केरळ (Kerala News) राज्यातील कान्हंगगड (Kasaragod) येथे एका 46 वर्षीय व्यक्तीच्या गुप्तांगात धातूचा नट अडकला. हा नट साधारण 1.5 इंच इतक्या लांबीरुंदीचा होता. ज्यामुळे त्याला त्रास होऊ लागला आणि वैद्यकीय आणिबाणी (Medical Emergency) उद्भवली, त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी चक्क अग्निशमन दलाच्या जवानांची मदत (Firefighters Rescue) घेऊन हा नट यशस्वीरित्या बाहेर काढला. मंगळवारी रात्री उशिरा कासारगोड जिल्हा रुग्णालयात ही काहीशी विचित्र आणि तितकीच असमान्य वाटावीअशी घटना घडली.

नट गुप्तांगात अडकला कसा?

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीडित व्यक्ती डॉक्टरांकडे पोहोचला तेव्हा प्रचंड वेदनांनी विव्हळत होता. त्याला मूत्रविसर्जन करण्यास अडथळा निर्माण झाला होता. ज्यामुळे त्याच्या मूत्राशयात लघवी तुंबली होती. त्यामुळे पोट फुगले होते आणि गुप्तांगात अडकलेला नट घट्ट रुतल्यामुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या. डॉक्टरांना माहिती देताना त्याने सांगितले की, आपणास दारु पिण्याचे प्रचंड व्यसन आहे. मी दारु प्यायल्याने त्याच्या अंमलाखाली येऊन बेशुद्ध झालो होतो, तेव्हा अज्ञातांनी हा नट त्याच्या गुप्तांगात सरकावला. जो तिथे अडकला आणि पुढील सर्व गुंतागुंती होऊन समस्या निर्माण झाल्या. वैद्यकीय मदत घेण्यापूर्वी हा नट गुप्तांगातून बाहेर काढण्यासाठी तो काढण्यासाठी दोन दिवस संघर्ष करत होता, असेही त्याने सांगितले. (हेही वाचा, Chicken Bone Stuck In Woman Throat: चिकन खाताना गळ्यात अडकले हाड, महिलेवर आठ तास शस्त्रक्रिया; लाखो रुपये खर्च)

अग्निशमन दलाकडून मदत

पीडित व्यक्ती आपली समस्या घेऊन डॉक्टरांकडे पोहोचला तेव्हा डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी त्याच्या लिंगात अडकलेला नट काढण्याचा प्रयत्न कसोशीने केला. पण तो असफल झाला. अखेर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय आणिबाणी हाताळताना मदतीसाठी कान्हंगगड अग्निशमन केंद्राशी संपर्क साधला. रुग्णालयाने मागितलेल्या मदतीवरुन अग्निशमन अधिकारी केएम शिजू यांच्या नेतृत्वाखाली एक पथक आले आणि त्यांनी धातूच्या कटरने काळजीपूर्वक तो नट कापला. कापण्याच्या प्रक्रियेत उष्णता निर्माण होत असल्याने, अग्निशमन दलाचे जवान रुग्णास भाजणे किंवा दुखापत होऊ नये म्हणून सतत पाणी ओतत होते. या नाजूक शस्त्रक्रियेला जवळजवळ एक तास लागला, त्यानंतर नट यशस्वीरित्या काढून टाकण्यात आला.

दरम्यान, गुप्तांगातून नट बाजूला करण्यात आला असला तरी, पीडित व्यक्तीला अद्यापही डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तो सध्या बरा आहे. मात्र, त्याच्या प्रकृतीत आणखी सुधारणा होणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान, ऐकायला अतिशय विचित्र आणि काहीशा अतिरेकी घटनेबाबत परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement