Kerala Assembly Election Results 2021: केरळ मध्ये LDF ची सलग दुसऱ्यांना सत्तेकडे वाटचाल
LDF ने तब्बल 91 जागांवर विजय मिळत बहुमत सिद्ध केले आहे.
केरळ विधानसभा निवडणूक (Kerala Assembly Election) 2021 मध्ये लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (LDF) आपली सत्ता राखण्यात यशस्वी झाला आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. LDF ने तब्बल 91 जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, बहुमतासाठी 71 जागांवर विजय मिळवणे गरजेचे होते. त्यामुळे LDF ला बहुमत मिळेल, यात शंका नाही. विशेष म्हणजे मागील 40 वर्षात केरळमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्यात कोणताही पक्ष यशस्वी झाला नव्हता. मात्र LDF ही परंपरा मोडीत काढत सलग दुसऱ्यांदा सत्तेकडे वाटचाल केली आहे. (येथे पहा: Assembly Elections 2021 Results Live Updates)
आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासूनच कल LDF च्या दिशेने झुकलेले होते. त्यानंतर काही वेळातच बहुमतापेक्षा अधिक ठिकाणी LDF ची आघाडी दिसून आली. विशेष म्हणजे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन हे धर्मदाम मतदारसंघातून विजयी झाले आहे. त्यांनी काँग्रेसच्या सी. रघूनाथन यांना 50,000 मतांनी मात दिली.
2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये LDF ने 91 जागांवर विजय मिळवत बहुमत सिद्ध केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा विजय मिळाला आहे. या विजयासाठी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी ट्विट करत केरळमधील जनतेचे आभार मानले आहेत. "आपण एकत्र येऊन कोरोना संकटावर मात करु आणि केरळचा विकासाच्या दृष्टीने वाटचाल करु," असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
केरळ मध्ये 6 एप्रिल 2021 रोजी एकाच टप्प्यात 14 जिल्ह्यांमधील तब्बल 140 जागांवर मतदान पार पडले. या निवडणूकीत सरासरी 74.57 टक्के मतदान झाले होते. दरम्यान, आज देशात केरळ सह चार विविध राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. आसाममध्ये भापज सत्ता राखण्यात यशस्वी झालं आहे. पश्चिम बंगालमध्येही ममता दीदींचा एकहस्ते विजय झाला आहे. तामिळनाडू मध्ये मात्र सत्तांतर झाल्याचे पाहायला मिळाले.