Kerala Assembly Election Results 2021: केरळ मध्ये LDF ची बहुमताकडे वाटचाल; 88 जागांवर आघाडी

आज देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिले कल हाती आले आहेत.

Chief Minister of Kerala Pinarayi Vijayan (PC- PTI)

देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election Results) निकाल आज (रविवार, 2 मे) लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिले कल हाती आले आहेत. हाती आलेल्या कलांनुसार LDF (Left Democratic Front) ची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. केरळ (Kerala) मध्ये एकूण 140 जागांवर विधानसभेची निवडणूक पार पडली. बहुमत मिळवण्यासाठी 71 जागांवर विजयी आवश्यक आहे. मात्र LDF ला त्याहून अधिक जागांवर आघाडी मिळाल्याचे हाती आलेल्या कलांनुसार स्पष्ट होते आहे.

LDF ला एकूण 88 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर काँग्रेस लीड UDF ला 48 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. LDF च्या CPIM ला 55 जागांवर आघाडी मिळाली असून CPI ला 24 जागांवर आघाडी मिळाली आहे. या निवडणुकीत बहुमत मिळवत सत्ता कायम राखण्यात LDF विजयी होणार असल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी 2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 91 जागांवर विजय मिळत LDF ने बहुमत सिद्ध केले होते. दरम्यान, सध्या केवळ मतमोजणीचे कल हाती आलेले असून अद्याप अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. (Assembly Elections 2021 Results चे Live Updates येथे पहा)

केरळमध्ये 6 एप्रिल 2021 रोजी एकाच टप्प्यात 140 जागांवर निवडणूक झाली. एकूण 14 जिल्ह्यांमध्ये सरासरी 74.57 टक्के मतदान झाले. सध्या केरळमध्ये LDF ची सत्ता असून पिनाराई विजयन मुख्यमंत्री आहेत.

दरम्यान, केरळ सोबतच आज पश्चिम बंगाल, असम, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या राज्यांच्या निवडणुकांचा निकालही लागणार आहे. पश्चिम  बंगालमध्ये टीएमसी आघाडीवर असून तामिळनाडू मध्ये DMK-Congress पुढे आहे. आसाममध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होईल, असे सध्याचे चित्र आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now