Kerala Accident: केरळात भरधाव स्कूल बसची रिक्षाला धडक, चार महिलांसह 5 जणांचा मृत्यू

हा अपघात इतका भयंकर होता की यामध्ये चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

Accident (PC- File Photo)

केरळ राज्यातून (Kerala State) एक दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. केरळच्या कासरगोड जिल्ह्यात (Kasargod) सोमवारी रात्री स्कूल बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण धडक झाल्याने हा अपघात घडली आहे. या दुर्घटनेत पाच महिलांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बसचा वेग जास्त होता आणि  बस चुकीच्या (Bus Accident) दिशेने येत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आबे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार महिलांसह पाच महिलांचा मृत्यू झाला आहे.

केरळमधील कासारगोड जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी स्कूल बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की यामध्ये चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार बसचा वेग जास्त होता आणि चुकीच्या दिशेने येत असल्याने हा अपघात झाला. बस शाळकरी मुलांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर परतत होती, त्यामुळे त्यात मुले नव्हती.

या अपघातात स्कूल बस आणि ऑटोचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्देवी म्हणजे अपघातात मृत झालेल्या चार महिला एकाच घरातील होत्या. दरम्यान या प्रकरणी बस चालक पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चालकाच्या विरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतले आहे.