Karnataka: बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना, आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी
या प्रकारामुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Karnataka: कर्नाटकातील बंगळुरु येथे शुक्रवारी रात्री उशिरा संभाजी सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्याचसोबत या प्रकराची तीव्र निषेध विविध ठिकाणी आता केला जात आहे.(Prime Minister Narendra Modi यांनी वाराणसी मध्ये कालभैरव मंदिरात मध्ये केली आरती Watch Video)
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर अनेक शिवप्रेमींनी घटनास्थळी एकत्रित येत रस्ते बंद केले. त्याचसोबत दगफेक ही केली गेली. परिणांमी बेळगामध्ये विविध ठिकाणी पोलिसांकडून बंदोबस्त करावा लागला. त्या घटनेचे आता पडसाद महाराष्ट्रात ही उमटल्याचे दिसून आले.(Intangible Heritage List: पश्चिम बंगालमधील 'दुर्गापूजा' युनेस्कोच्या 'अमूर्त वारसा यादीत' समाविष्ट; जाणून घ्या हा दर्जा मिळालेल्या भारतामधील इतर गोष्टी)
Tweet:
या घटनेवरुन राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट मध्ये असे म्हटले की, कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. म.ए.समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. तसेच कर्नाटक सरकारने बेळगाव वर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय त्याचाही तीव्र निषेध. बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं. मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही.
Tweet:
दरम्यान, बंगळुरुत घटलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या प्रकाराचे काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यावरुन आता संतापाची लाट उसळली असून आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.