कर्नाटक मध्ये आढळला Eta Variant चा रुग्ण; कसं आहे कोविड-19 चं नवं स्वरुप? जाणून घ्या
कर्नाटक मधील बंगळुरु मध्ये कोविड-19 चा नवा वेरिएंट आढळून आला आहे. चार महिन्यांपूर्वी घेतलेल्या सॅपल्समधून या नव्या वेरिएंटचे निदान झाले आहे.
कर्नाटक (Karnataka) मधील बंगळुरु मध्ये कोविड-19 (Covid-19) चा नवा वेरिएंट (Variant) आढळून आला आहे. चार महिन्यांपूर्वी घेतलेल्या सॅपल्समधून या नव्या वेरिएंटचे निदान झाले आहे. इटा (Eta) असा हा नवा वेरिएंट असून कत्तारला (Qatar) गेलेल्या व्यक्तीमध्ये हा वेरिएंट आढळून आला आहे. राज्यातील इटा वेरिएंट बाधित रुग्ण आढळल्याचा हा पहिला प्रकार नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, यापूर्वी तो दोन सॅपल्समध्ये आढळून आला होता. (Covid-19 Delta Plus Variant: काय आहे कोविड-19 चे नवे डेल्टा प्लस वेरिएंट? जाणून घ्या सविस्तर)
कसं आहे कोविड-19 चं नवं स्वरुप Eta Variant?
# यूएस कंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन (सीडीसी) नुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये युनायटेड किंगडम आणि नायजेरियामध्ये इटा व्हेरिएंट पहिल्यांदा आढळला.
# जागतिक आरोग्य संघटनेने जून 2021 मध्ये वेरिएंटला इटा हे नाव दिले.
# इटाचे variant of interest म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. WHO च्या म्हणण्यानुसार community transmission or multiple COVID-19 clusters म्हणून हा वेरिएंट ओळखला जातो.
# अल्फा, बीटा आणि गामामध्ये आढळणारे समान N501Y म्युटेशन ईटा व्हेरिएंटमध्ये आढळत नाहीत.
# अहवालांनुसार, हा प्रकार इतर सर्व प्रकारांपेक्षा वेगळा आहे कारण यात E484K आणि F888L दोन्ही म्युटेशन आहेत.
# या वर्षी जुलैमध्ये, मिझोरममधील आयझॉलमध्ये ईटा व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळला होता.
दरम्यान, सध्या कोरोना व्हायरसची दुसरी लाट देशात ओसरत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. त्यात इटा वेरिएंटचे रुग्ण आढळल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावर निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र हा वेरिएंट जुना असून त्याची अद्याप पुष्टी झाली नव्हती. त्यामुळे हा वेरिएंट धोकादायक असता तर आतापर्यंत बरेच रुग्ण आढळून आले असते, असे तज्ञांचे मत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)