Kanpur Police: शंभर वर्षांच्या महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा, कानपूर पोलिसांकडून FIR दाखल

Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

कानपूर येथील एका 100 वर्षे वयाच्या (100-Year-Old Woman) महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रकाली देवी (Chandrakali Devi) असे या महिलेचे नाव आहे. तिच्याविरुद्ध 10 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. माधूरी नावाच्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. शंभर वर्षाच्या चंद्रकाली देवी हिला चालता येत नाही. नुकतीच तिने कानपूर पोलीस आयुक्तांची (Kanpur Police Commissioner) भेट घेतली. तिला चालता येत नसल्याने ती आपल्या मुलीसोबत आली होती.

तक्रारदार असलेल्या माधुरी नामक महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, हा वाद भूखंड आण मालमत्तेशी संबंधीत आहे. जो आपल्या नावे खरेदी करण्यात आला आहे. परंतू, आरोपी महिलेने खोटी कागदपत्रे तयार करुन या मालमत्तेवर दावा सांगितला. इतकेच नव्हे तर तिने 6 मे रोजी कथीतपणे आपल्या प्लॅटचे फाटक तोडले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी जमीनीशी निगडीत काम करण्यासाठी आपण फ्लॅटवर पोहोचलो असता 10 ते 12 जणांच्या टोळक्याने आपल्यावर हल्ला केला आणि प्लॅटच्या आजूबाजूला सुरु असलेले कामही थांबवले.

माधुरी नामक महिलेने आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, या घटनेत सुषमा तिवारी आणि कृष्णा मुरारी यांच्यासह महिलेची मुलगी ममता दुबे यांचाही सहभाग होता. माधुरी यांनी आपल्या तक्रारीत उल्लेख केला आहे की, चंद्रकाली, सुषमा तिवारी, कृष्णा मुरारी आणि ममता दुबे ही खंडणीखोर टोळी चालवतात. कारण हे लोक इथे खूप दिवसांपासून राहत आहेत. ते सातत्याने आजूबाजूच्या लोकांना धमकावत असतात. इतकेच नव्हे तर 5 ते 10 लाख रुपये घेतल्याशिवाय ते कोणाचेही घर बांधू देत नाहीत.

चंद्रकला देवी हिने आपल्याला 10 लाख रुपये दे तरच घर बांधू देईल. पैसे न देता बांधकाम सुरु केल्यास चंद्रकाला आणि तिच्या टोळीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा माधूरी यांनी तक्रारीत केला आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, 100 वर्षीय महिलेने कानपूरचे पोलीस आयुक्त बीपी जोगदंड यांच्याकडे आपली बाजू मांडली. तसेच, आपल्यावर झालेल्या खंडणीच्या आरोपांची निष्पक्षपणे चौकशी करण्याचीही विनंती केली.

दहा लाख रुपये खंडणी मागितल्याचा आरोप असलेली चंद्रकाला देवी मिर्झापूर नई बस्ती येथील रहिवासी आहे. तिची मुलगी ममता दुबे हिचे म्हणने असे की, तक्रारदार महिला ममता दुबे हिच्या प्लॅटचा ताबा घेत होती. जो तिला (ममता) तिची आई चंद्रकला देवी हिच्याकडून मिळाला होता. तिने त्यांना प्लॉटचा ताबा देण्यास नकार दिल्यावर त्यांनी तिच्या आईविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचे ती म्हणाली.