Vikas Dubey Encounter: कानपूर पोलिस हत्या प्रकरणातील मास्टर माईंड विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू
कानपूर मध्ये 8 पोलिसांची हत्या करण्याचा आरोप असलेल्या विकास दुबे याला काल पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर इन्काऊंटर (Kanpur Encounter) प्रकरणातील मास्टर माईंड विकास दुबे (Vikas Dubey) याचा मृत्यू झाला आहे. कानपूर मध्ये 8 पोलिसांची हत्या करण्याचा आरोप असलेल्या विकास दुबे याला काल पोलिसांनी उज्जैन येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर विकास दुबे याला परत आणण्याची जबाबदारी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स वर सोपवण्यात आली होती. विकास दुबे याला मध्य प्रदेशातून कानपूरला परत आणणारी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सची एक गाडी पलटली. पलटलेल्या गाडीतून विकास दुबे याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात विकास दुबे याचा मृत्यू झाला. (कानपूर एन्काऊंटर प्रकरणातील कुख्यात गुंड विकास दुबे याला उज्जैन मधून अटक)
कानपूर वेस्टच्या एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विकास दुबे याला शरण येण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्याने एका पोलिस अधिकाऱ्यावर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबार विकास दुबे गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या गँगस्टरला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
PTI Tweet:
ANI Tweet:
गुरुवार (9 जुलै) रोजी उज्जैनमध्ये कानपुर एनकाऊंटरमधील मुख्य आरोपी विकास दुबे याला अटक केल्यानंंतर स्पेशल टास्क फोर्सच्या टीमवर त्याला परत आणण्याची जबाबदारी सोपवली होती. गुरुवारी सकाळी 8.30 वाजता उज्जैनमधील महाकाल मंदिरामध्ये विकास दुबे याला अटक करण्यात आली होती. कानपूर मधील 8 पोलिसांची हत्या केल्यानंतर गँगस्टर हा दोन दिवस नोएडामध्ये लपून बसला होता.