IPL Auction 2025 Live

धक्कादायक! Amazon वर विकले जात आहेत कन्नड राज्य ध्वजाचे Bikinis आणि Bras; ई-कॉमर्स कंपनीवर बहिष्कार घालण्याची मागणी

अ‍ॅमेझॉनवर चक्क कर्नाटकच्या ध्वजाच्या रंगामध्ये बिकिनी व ब्रा विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. असे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

दोनच दिवसांपूर्वी ‘भारतामधील सर्वात कुरूप भाषा’ (Ugliest Language in India) म्हणून ‘कन्नडा’चा उल्लेख केल्याने गुगलवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर गुगलला माफीही मागावी लागली होती. आता ई-कॉमर्स दिग्गज अ‍ॅमेझॉन (Amazon) एका नव्या मुद्द्यावरून अडचणीत आले आहे. अ‍ॅमेझॉनने कर्नाटक राज्याच्या ध्वजाचा (Karnataka Flag) अवमान केल्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. अ‍ॅमेझॉनवर चक्क कर्नाटकच्या ध्वजाच्या रंगामध्ये बिकिनी व ब्रा विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. असे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

कर्नाटक राज्याचा ध्वज आणि त्यावरील प्रतिक वैशिष्ट्य हे म्हैसूर राजघराणे आणि युनायटेड किंगडमच्या शस्त्रास्त्रांचा कोट यावर आधारित आहे. माहितीनुसार कर्नाटक सरकारने केलेल्या सर्व अधिकृत पत्रव्यवहारावर त्याची नोंद असते. परंतु अ‍ॅमेझॉन या भावनांवर विचार करण्यात अयशस्वी ठरला आहे. याआधी जसे अमेरिका, ब्रिटन आणि इतर काही देशांचे झेंडे बिकिनी व ब्रा म्हणून विकले गेले, तसेच आता त्या यादीत कर्नाटक ध्वजदेखील सामील झाला आहे.

या बिकिनी व ब्राचे व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड समोर आल्यानंतर, कन्नड समर्थक संघटना अ‍ॅमेझॉन इंडियाविरूद्ध पोलिस तक्रार नोंदविण्याचा विचार करीत आहेत. तसेच अ‍ॅमेझॉनवर बहिष्कार घालण्याची आणि ई-कॉमर्स फर्मला वाईट रिव्ह्यू देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा संदेश कंपनीपर्यंत पोहोचावा यासाठी ई-कॉमर्सविरूद्ध हॅशटॅग शेअर केला जात आहे. आशा केली जात आहे की, कर्नाटक आणि राज्यातील लोकांच्या भावना दुखावणारे असे वादग्रस्त पाऊल अ‍ॅमेझॉनकडून मागे घेतले जाईल. (हेही वाचा: Google ने मागितली जाहीर माफी; भारतामधील सर्वात कुरूप भाषा म्हणून केला होता 'कन्नडा'चा उल्लेख)

याबाबत कर्नाटकाचे मंत्री अरविंद लिंबावाली यांनी अ‍ॅमेझॉनने तबतोड माफी मागावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुगलवर ‘भारतामधील सर्वात कुरूप भाषा’ असे शोधले असते, तर गुगलने आपल्याला त्याचे उत्तर ‘कन्नड’ भाषा असे दिले असते. याच मुद्द्यावरून सोशल मिडियावर गुगलवर प्रचंड टीका झाली होती. त्यानंतर रात्री उशिरा गुगलने याबाबत जाहीर माफी मागितली.