Kalyan Crime News: कॅबमध्ये तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीला अटक

कल्याणमध्ये धावत्या कॅबमध्ये प्रवासादरम्यान तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी कॅब चालकाला अटक केली आहे.

Kalyan Crime News: कॅबमध्ये तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीला अटक
arrest

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. कल्याणमध्ये धावत्या कॅबमध्ये (Cab) प्रवासादरम्यान तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी कॅब चालकाला अटक केली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी (Kolsewadi Police Kalyan) आरोपी राकेश जयस्वाल याला नवी मुंबईतील (Navi Mumbai Airoli) ऐरोलीमधून अटक केली आहे.  (हेही वाचा -Samruddhi Mahamarg: कानात हेडफोन, मोबाईलवर सिनेमा पाहा समृद्धी महामार्गावर चालवली बस, मनसेकडून कारवाईची मागणी (Watch Video))

पीडित 23 वर्षीय तरुणी ही कल्याण पूर्वेतील नेतेवली भागात राहत असून ती नवी मुंबई येथील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. त्यातच  पीडित तरुणी ही नवी मुंबई येथे नेहमीप्रमाणे शुक्रवारी कामावर गेली होती.  त्यानंतर. 14 ऑक्टोबर पहाटेच्या  सुमारास कंपनीमधील काम आटोपून घरी जाण्यासाठी पीडितेने कॅब कंपनीची कार बुक केली होती.  पीडित तरुणी कॅबमध्ये झोपली होती. ही संधी साधताच चालक राकेश याने पीडित तरुणीवर कारमध्येच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या घृणास्पद कृत्यामुळे  पीडित तरुणीने आरडा ओरडा केला. त्यावेळी  घाबरलेल्या नराधम कॅब चालकाने पीडित तरुणीला पहाटेच्या तीन वाजल्याच्या सुमारास सूचक नाका रस्त्यावर सोडून पळ काढला होता.

पीडित तरुणीने  कॅब चालकाविरोधात भादंवि कलम 354, 509 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशुमख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कॅब चालकावर गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार कुठल्या दिशेला गेली हे दिसून आले. आरोपीला पोलिसांनी नवी मुंबईत अटक केली.

(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2023 06:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).