Jyoti Mourya Call Recording Viral: ज्योती मौर्य यांचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; अलोकला पुन्हा दिली धमकी
व्हायरल झालेल्या कॉलमध्ये ज्योती म्हणतात की, “मला मनीष सोडेल किंवा नाही पण मला तुमच्याबरोबर राहायचं नाही. तुमच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करायची मला इच्छा नाही,
SDM ज्योती मौर्य (Jyoti Mourya) यांचे पती आलोक मौर्य (Alok Mourya) यांनी होमगार्ड मुख्यालयात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये त्यांच्या पत्नीचे गाझियाबाद होमगार्डचे कमांडंट मनीष दुबे यांच्याशी प्रेमसंबंध असून ते दोघे त्यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा दावा केला आहे. तर आपल्याकडे दोघांच्या चॅट्सचे स्क्रिनशॉट व कॉल रेकॉर्डिंग असल्याचेही आलोक यांनी सांगितले आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर ज्योती व आलोक यांच्यातील कॉलच्या संभाषणाचा ऑडिओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Madhya Pradesh: ऐकाव ते नवलंच! नवरा जेवणात टोमॅटो वापरतो म्हणून बायको गेली सोडून; जाणून घ्या सविस्तर)
व्हायरल झालेल्या कॉलमध्ये ज्योती म्हणतात की, “मला मनीष सोडेल किंवा नाही पण मला तुमच्याबरोबर राहायचं नाही. तुमच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करायची मला इच्छा नाही, तुम्ही लोकं मला पैसे व गाडी मागून त्रास देत होतात, मला जिथे पुरावा द्यायचा तिथे मी देईनच, तुम्हाला तमाशा करायचा असेल आणि प्रेमाने मला सोडायचं नसेल तर तुम्हाला जे करायचे ते करा, तुम्हाला तपास करायचा असेल करा, माझी नोकरी गेली तरी चालेल हरकत नाही.”
सफाईकर्मी पति के दम पर बनीं अफसर, फिर उसी को दे दिया धोखा,पति के साथ बातचीत का ऑडियो वायरल...#breakingnews #LatestVideo #Trending #PCSofficer #JyotiMaurya #AlokMaurya pic.twitter.com/4LftUytHGM
— Nedrick News (@nedricknews) June 27, 2023
तर यावेळी आलोक यांनी उत्तर दिले की, “मी प्रेम तर सोडणारच नाही, तू माझी बायको आहेस, बायको नेहमीच राहशील. तुलाही माहित आहे की ज्या हुंड्याचं तू नाव घेत असतेस, तू किती हुंडा आणला होतास हे तू ओळखून आहेस. फोनमध्ये वेगळ्या नावाने नंबर सेव्ह करून मनीषला भेटायला जातेस हे काय मला कळत नाही का? तो रात्री १२ वाजता कॉल करतो, चार चार वेळा कॉल करतो, जेव्हा मी उचलला तेव्हा काही बोलत नाही. हे सगळं का घडतंय आम्हाला माहित आहे. “
(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2023 07:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

