पश्चिम बंगाल: मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या भेटीनंतर डॉक्टरांचा संप अखेर मागे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या भेटीनंतर बंगलामधील डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या भेटीनंतर आठवडाभरापासून संपावर असलेल्या बंगालमधील डॉक्टरांनी आपला संप अखेर मागे घेतला आहे. आंदोलन करणारे ज्युनिअर डॉक्टर आणि मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यात राज्य सचिवालयात बैठक झाली. या बैठकीत मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे सामोरे जावे लागणाऱ्या अडचणी डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या.
पश्चिम बंगालचे स्वास्थ्य सचिव, राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य आणि राज्याचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान राज्य सरकारने कोणत्याही डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल न केल्याची माहिती ममता बनर्जी यांनी दिली. या उलट डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य त्या पर्यायांचा विचार करुन त्या दृष्टीने पाऊलं उचलली जातील, असे आश्वासन देण्यात आले. त्याचबरोबर एनआरएस हॉस्पिटलमधील प्रकारानंतर पाच लोकांना अटक करण्यात आली. (महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय सेवा राहणार ठप्प, रुग्णांचे होणार हाल; डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निशेधार्थ IMA चा बंद)
ANI ट्विट:
एनआरएस हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, त्यामुळे इतरांनाही यातून धडा मिळेल, अशी मागणी ज्युनिअर डॉक्टरांनी या बैठकीत केली.