जेएनयू राष्ट्रद्रोह प्रकरणी विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांच्यावर गुन्हा दाखल

कन्हैय्या कुमार यांच्यासह उमर खालिद, अनिर्बान चटर्जी, शहाला राशिद, डीएमके नेते डी राजा यांची मुलगी अपराजिता राजा, आकिब हुसेन, मुनीब हुसेन, उमर गुल, राइया रसूल आणि बलीश भट यांच्यासह इतरही काही जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Kanhaiya Kumar | (Image courtesy: Archived, edited and representative images)

JNU Sedition Case: जेएनयू राष्ट्रद्रोह प्रकरणात विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांच्यासह अनेकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पटियाला हाऊस न्यायालयात दिल्ली पोलीस (Delhi Police) एका भल्या मोठ्या पेठाऱ्यात अनेक कागदपत्रं घेऊन पोलीस सोमवारी (14 जानेवारी) पोहोचले. त्यानंतर 1200 पानांचे आरोपपत्र भारतीय दंड संहिता (IPC) अन्वये दाखल करण्यात आले.

दरम्यान, कन्हैय्या कुमार यांच्यासह उमर खालिद, अनिर्बान चटर्जी, शहाला राशिद, डीएमके नेते डी राजा यांची मुलगी अपराजिता राजा, आकिब हुसेन, मुनीब हुसेन, उमर गुल, राइया रसूल आणि बलीश भट यांच्यासह इतरही काही जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा, पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा दिल्ली पोलीस आयुक्तांना ईमेल)

2016मध्ये जेएनयूमध्ये घोषणाबाजी झाली होती. न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपपत्रात भारतीय दंड संहिता कलम 124 ए, 323, 465, 471, 143, 149, 147, 120 बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालय या आरोपपत्रावर मंगळवारी (15 जानेवारी) विचार करणार आहे.