Jharkhand: पाच वर्षांच्या नातवाला विहिरीत फेकले, अपमानाचा बदला घेण्यासाठीअमानुष कृत्य; सावत्र आजीला अटक
मुलाच्या पालकांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाच्या सावत्र आजीने त्याला विहीरीत फेकले. ही घटना झारखंड (Jharkhand) राज्यातील हजारीबाग जिल्ह्यात घडली.
Jharkhand News: विहीरीत फेकलेल्या पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलाच्या पालकांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाच्या सावत्र आजीने त्याला विहीरीत फेकले. ही घटना झारखंड (Jharkhand) राज्यातील हजारीबाग जिल्ह्यात घडली. आजी असलेल्या 55 वर्षीय आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करुन तिला कोर्टासमोर हजर केले असता तिची रवानगी कारागृहात झाली आहे. फैजल अन्सारी रोझ अशी मृत मुलाची ओळख पटली आहे. फैजल आणि त्याच्याच वयाचा एक नातेवाई मुलगा अंगणवाडीत शिकत असत. अंगणवाडीतून बाहेर पडल्यानंतर दोघे दररोज घरी येत असे. मात्र, घटना घडली त्या दिवशी तो मुलगा एकटाच घरी आला. त्याच्यासोबत फैजल आलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेणे सुरु केले.
कटकमसांडी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रकाश मिश्रा यांनी पीडीटीआयसोबत बोलताना सांगितले की, फैजलचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरु केला. प्रदीर्घ काळ शोधल्यानंतर गावाजवळच्या एका विहीरीत त्याचा मृतदेह आढळून आला. गळ्यात दोन विटा बांधलेल्या मुलाचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी विहिरीतून बाहेर काढण्यात आला. गावकऱ्यांना प्रथम फैजल याची चप्पल विहिरीजवळ आढलली. त्यानंतर गावकऱ्यांचा संशय वाडल्याने त्यांनी विहीरीत डोकावून पाहिले असता त्याचा मृतदेह आढळून आला.
पोलीस तपासावेळी मृत मुलाच्या कुटुंबातील एका सदस्याचे वर्तन संशयास्पद वाटले. त्यात मृत मुलाच्या वडीलांनी त्याची सावत्र आई सरबरी खातून हिच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी त्यांच्या पद्धीतने केलेल्या चौकशीत आजी सरबरी खातून हिने फैजल याच्या हत्येची कबूली दिली. मुलाच्या आईवडीलांकडून तिला सातत्याने अपमानीत केले जात असल्याने हे कृत्य केल्याचे तीने जबाबात सांगितले.