Jharkhand Legislative Assembly Elections Result 2019: ABP News-C Voter सर्वेमध्ये महागठबंधनची बाजी, 31-39 जागा मिळण्याची शक्यता, भाजपचे कमळ 28-36 वर थांबण्याची चिन्हे
Jharkhand Election Vidhan Sabha Exit Poll 2019

Jharkhand Vidhan Sabha Elections Result 2019:  झारखण्ड विधानसभा निवडणूक 2019 (Jharkhand Assembly Election 2019) साठी एकूण पाच टप्प्यांत मतदान पार पडले. या मतदानाचा आज (शुक्रवार, 20 डिसेंबर 2019) पाचवा आणि अंतिम टप्पा पार पडला. पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सायंकाळी 6 वाजता पूर्ण होताच विविध प्रसारमाध्यमं आणि संस्थांचे एक्झिट पोल्सचे अंदाजही जाहीर झाले आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ......या संस्थांनी मतदारांचा कल जाणून घेतला. या संस्थांचे एक्झिट पोल्स अंदाज पुढील प्रमाणे.

एक्झिट पोल्स अंदाज

दरम्यान, 1 नोव्हेंबर 2019 रोजी निवडणूक आयोगाने झारखण्ड विधानसभा निवडणूक (Jharkhand Legislative Assembly Elections 2019) तारखांची घोषणा केली होती.. या घोषणेनुसार झारखण्ड विधानसभेची निवडणूक 5 टप्प्यात पार पडत पडली. पहिला टप्पा 30 नोव्हेंबर, दुसरा 7 डिसेंबर, तिसरा टप्पा 12 डिसेंबर, चौथा टप्पा 16 डिसेंबर तर पाचवा टप्पा आज म्हणजेच 20 डिसेंबर रोजी पार पडला. या पाचही टप्य्यांतील मतदानाची मतमोजणी 23 डिसेंबर 2019 या दिवशी पार पडणार आहे.

दरम्यान, प्रत्येक विधानसभा, लोकसभा निवडणुकीत विविध प्रसारमाध्यमं, संस्था एक्झिट पोल्सचे अंदाज जाहीर करतात. परंतू, हे अंदाज त्याच्या संस्था, प्रसारमाध्यमं मोठ्या उत्साहाने व्यक्त करत असले तरी, हे काही अंतिम निकाल नसतात. एक्झिट पोल्सचे अंदाच खुपच कमी वेळा खरे ठरले आहेत. अनेकदा एक्झिट पोल्स तोंडावरही आपडले आहेत.

एबीपी न्यूज सी वोटर

एबीपी न्यूज सी वोटर सर्वेमध्ये महागठबंधन सत्तेत बाजी मारण्याची शक्यता वर्तवली आहे. एबीपी न्यूज सी वोटर सर्वेनुसार महागटबंधनला 13-39 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ,भाजपला 28-36 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

अलिकडेच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सनी राणा भिवदेवी थाटात आपले अंदाच व्यक्त केले होते. या अंदाजांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल. तसेच, शिवसेना दुसऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अनुक्रमे तिसऱ्या आणि चौध्या स्थानावर दर्शवले होते. प्रत्यक्षात मात्र, भारतीय जनता पक्षाला कशाबशा 105 जागा मिळाल्या. शिवसेना पक्षालाही 2014 च्या तुलनेत कमी यश मिळाले पण शिवसेने 57 राष्ट्रवादी काँग्रेस 54 तर काँग्रेस 44 जागांवर विजयी झाले. या निकालाचा एक्झिट पोल्स अंदाजासाठी संबंध लावायचा झाल्यास एक्झिट पोल्स तोंडावरच आपटले. त्यामुळे झारखंड विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल काय असेल त्याबाबत एक्झिट पोल्सनी विविध अंदाज व्यक्त केले आहेत खरे. परंतू, जनतेच्या मनात नेमके काय आहे ते, येत्या 23 डिसेंबर या दिवशीच कळणार आहे.