झारखंड: प्रेमात फसवणूक झाल्याने 20 वर्षीय मुलाची गळफास लावून आत्महत्या
प्रेम करणे ही चुकीची गोष्ट नाही पण त्यात तुमच्यासोबत धोका झाल्यास एखाद्याने जीव दिला तर ही गोष्ट गंभीर बनते. अशाच पद्धतीची एक धक्कादायक घटना झारखंड मधील धनबाद येथून समोर आली आहे.
प्रेम करणे ही चुकीची गोष्ट नाही पण त्यात तुमच्यासोबत धोका झाल्यास एखाद्याने जीव दिला तर ही गोष्ट गंभीर बनते. अशाच पद्धतीची एक धक्कादायक घटना झारखंड मधील धनबाद येथून समोर आली आहे. येथील 20 वर्षीय मुलाने प्रेमात फसवणूक झाल्याने स्वत:ला गळफास लावून घेत आपले आयुष्य संपवले आहे. या प्रकारामुळे घरातले अत्यंत दु:खी झाले आहेत. सध्या पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून अधिक तपास करत आहेत.(Hyderabad: 24 वर्षात 18 महिलांच्या हत्या करणारा सीरियल किलर गजाआड; पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर)
राजा निषाद असे मुलाचे नाव आहे. वडीलांकडे बाहेर खाण्यासाठी पैसे त्याने मागितले आणि रात्री तो घरी परतलाच नाही. रात्री उशिर झाला तरीही राजा घरी न आल्याने त्याला फोन सुद्धा केलाय पण त्याने उचलला नाही. याच दरम्यान तेथील रुग्णालयाच्या येथील एका क्वार्ट्सच्या येथे राजा याची बाइक दिसली. त्यामुळे तेथील लोकांनी घरातील मंडळींना फोन करत त्याच्या बद्दल सांगितले. घरातील मंडळी येथे आल्यानंतर त्यांनीजे पाहिले त्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यावेळी राजा याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांना दिसले.(भोपाल: Happen App वरुन अल्पवयीन मुलीला मैत्री करणे पडले महागात, पहिल्याच भेटवेळी तरुणाने केला बलात्कार)
वडिलांनी पोलिसांना असे म्हटले की, राजा याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. त्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाल्याने राजा याने ऐवढे मोठे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शंका वडिलांनी व्यक्त केली.
(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2021 12:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

