Jaya Bachchan And Jagdeep Dhankhar Over Amitabh: महिलांना पतीच्या नावानेच का ओळखले जावे? जया बच्चन यांचा जगदीप धनखड यांच्याबोत शाब्दिक खटका (Watch Video)
यावरुन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्यासोबतही जया यांचा शाब्दिक खटका उडाला. ज्यामुळे महिलांच्या स्वतंत्र ओळखीबाबत नव्याने चर्चा सुरु झाली आहे.
स्त्री-पुरुष समानता मानली जाणाऱ्या समाजात आणि त्यातही खास करुन आज महिलांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असताना, त्यांना त्यांच्या पतीच्या नावाने ओळखले जावे का? आजच्या नव्या भारतासाठी आणि समाजव्यवस्थेसाठी हा प्रश्न खरोखरच उपस्थित करण्यासारखा आहे. जो समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी राज्यसभा सभागृहात उपस्थित केला आहे. उपसभापती हरिवंश नारायण सिंह (Harivansh Narayan Singh) यांनी 'जया अमिताभ बच्चन' (Jaya Amitabh Bachchan) असे उच्चारले. यावरुन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्यासोबतही जया यांचा शाब्दिक खटका उडाला. ज्यामुळे महिलांच्या स्वतंत्र ओळखीबाबत नव्याने चर्चा सुरु झाली आहे.
नेमके काय घडले?
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन काळात राज्यसभेचे कामकाज सुरु असताना उपसभापती हरिवंश नारायण सिंह पीठासीन अधिकारी होते. प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी जया बच्चन यांचे नाव उच्चारले. पण ते उच्चारताना त्यांनी 'जया अमिताभ बच्चन' असा उल्लेख केला. ज्यावर जया बच्चन यांनी आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या महिलांना त्यांच्या पतीच्या नावानेच ओळखले जाणे गरजेचे आहे का? त्यांच्या पतीशिवाय त्यांची स्वतंत्र ओळखच असत नाही काय? केवळ जया बच्चन असे म्हटले असते तरी चालले असते. (हेही वाचा, Amitabh- Jaya Bachchan Marriage: बिग बींनी अखेर सांगितले जया बच्चनशी लग्न करण्यामागचे खरे कारण)
हरिवंश नारायण सिंह यांचे स्पष्टीकरण
जया बच्चन यांनी घेतलेल्या हरकतीवर पीठासीन अधिकारी हरिवंश नारायण सिंह यांनी लगोलग स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटले की, इथे आपले नाव अधिकृतपणे 'जया अमिताभ बच्चन' असेच लिहीले आहे. यावर हे नवीनच प्रकरण आपण सुरु केले आहे. जिथे सभागृहाती महिलांचे नाव त्यांच्या पतीच्या नावासह घेतले जात आहे. (हेही वाचा, Amitabh Bachchan: अभिषेक बच्चन पाठोपाठ अमिताभ यांनी खरेदी केल्या 3 व्यावसायिक मालमत्ता, किंमत पाहून बसेल धक्का)
जगदीप धनखड यांच्यासोबतही शाब्दिक खटका
दरम्यान, पाठिमागच्या आठवड्यात उपसभापतींसोबत असाच खटका उडाला असताना राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनीही 'जया अमिताभ बच्चन' असेच नाव पुकारले. त्यावर मात्र जया बच्चन संतापल्या. त्यांनी उभे राहात थेट म्हटले की, पाठिमागच्या आठवड्यातही यावरुनच चर्चा झाली होती. मला आशा आहे की, आपणास 'अमिताभ'चा अर्थ माहित असेल. मला माझे पती आणि त्यांच्या कामगिरीवर गर्व आहे. पण, आपण हे नवीनच नाटक सुरु केले आहे. असे पूर्वी कधीही होत नव्हते. अमिताभचा अर्थ आहे आभा.. जो कधीही संपू शक नाही.
व्हिडिओ
उपराष्ट्रपतींचा सल्ला
जया बच्चन यांच्या आक्षेपावर प्रतिक्रिया देताना जगदीप धनखड यांनी म्हटले की, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन आपल्या प्रमाणपत्रावरील नाव अधिकृतपणे बदलू शकता. पुढे त्यांनी म्हटले की, अमिताभ बच्चन यांच्या कामगिरीवर संपूर्ण देशाला अभिमान आहे. जयाजी मी आपले तेच नाव घेतले आहे. जे इलेक्शन सर्टिफिकेटवर आहे. नाव बदलण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा लाभ मी स्वत:ही घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, धनखड यांनी मनोहर लाल खट्टर यांचे नाव पुकारले. यावर जया बच्चन यांनी हसत हसत म्हटले की, आता यांच्या नावासमोरही त्यांच्या पत्नीचे नाव घ्यायला हवे. त्यानंतर काहीशा मिष्कील टीप्पणीनंतर ही चर्चा संपुष्टात आली.