इराणने युक्रेनचे विमान चुकून उडवल्याचा अमेरिकेचा विश्वास

बुधवारी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांचा निकाल लागला. त्यानंतर आज मुंबई महापालिकेच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक 141 मध्ये आज पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी 10 जानेवारीला होणार आहे.

10 Jan, 05:05 (IST)

बुधवारी सकाळी तेहरानच्या विमानतळावर युक्रेनच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातात 176 लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र इराणने चुकून या विमानावर हल्ला केल्या असल्याचा अमेरिकेचा विश्वास आहे. याबाबत बोलण्यास पेंटॅगॉनने नकार दिला आहे.

 

 

10 Jan, 04:30 (IST)

आज, गुरुवारी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना हटवण्यास नकार दिला गेला आहे. मंत्रालयाने सांगितले की, कुलगुरूंना काढून टाकणे हा तोडगा नाही. कॅम्पसमध्ये उपस्थित प्रश्न सोडविणे यावर सरकारचे लक्ष आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थी आणि प्रशासनाच्या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या 'फॉर्म्युला' लागू करणे आवश्यक आहे. कुलगुरूंसह विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी मंत्रालयात बोलावण्यात आले असून त्यावेळी विद्यार्थ्यांच्या दाव्यांविषयी चर्चा केली जाईल.

10 Jan, 03:58 (IST)

महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यानंतर हर्षवर्धन सदगीरवर शुभेच्छांचा वर्षाव झाला, कौतुक झाले. मात्र ठरलेल्या बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याची माहिती काका पवार यांनी दिली होती. स्पर्धेच्या आयोजकांनी ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्याला दीड लाख रुपयांचे, तर उपविजेत्याला 75 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र हा किताब जिंकल्यावर हर्षवर्धन सदगीर याला फक्त 20 हजार रुपये देण्यात आले अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. ही गोष्ट शरद पवार यांना समजताच त्यांनी हर्षवर्धन सदगीरला 12 लाखांचा धनादेश त्यांनी दिला आहे.

10 Jan, 03:13 (IST)

यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत एक धार्मिक वाद उफाळून आला आहे. साहित्य साम्मेलांच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. मात्र त्यांना ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघाने ज्येष्ठ साहित्यिक ना.धो. महानोर यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहू नये, असा इशारा दिला आहे. याबाबत एक पत्र ब्राह्मण महासंघाने ना.धो. महानोर यांना लिहिले आहे. साहित्य संमेलनाच्या ठिकाणी 150 ख्रिस्त धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत, याच गोष्टीला ब्राह्मण महासंघाचा विरोध आहे. 

10 Jan, 02:23 (IST)

पुणे येथील श्री छत्रपती क्रीडा संकूल येथे पार पडलेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अंतिम विजेता मल्ल हर्षवर्धन सदगीर याला 12 लाख रुपयांचे इनाम देण्यात आले आहे.

10 Jan, 02:02 (IST)

विम्याचे हाप्ते, सेवा आणि इतर मागण्यांसाठी डोंबिवली शहरात ज्येष्ठ नागरिकांनी आदोल नकेले. यात सेवानिवृत्त कर्मचारी, महिला आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.

10 Jan, 01:09 (IST)

जिल्हा परिषद निवडणुकीत भारजपचा मोठा पराभव झाला नाही. उलट आगोदरपेक्षा आमच्या जागा वाढल्या आहेत. नागपूरमध्येही आमचे संख्याबळ 21 वरुन केवळ 15 इतके कमी झाले इतकेच. पण आजही राज्यात भारतीय जनता पक्षच सर्वात मोठा पक्ष असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमिवर भाजपची चिंतन बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीनंतर फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

10 Jan, 01:03 (IST)

उद्यापसून सुरु होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी अज्ञाताकडून ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांना मिळाली आहे. ना धो महानोर हे यंदा उस्मानाबाद येथे पार पडत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय साहित्यस संमेलनाचे उद्घाटक आहेत.

10 Jan, 24:06 (IST)

वाहतूक विभागातील  पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे (DIG Nishikant More) यांना पदावरुन निलंबीत करण्यात आले आहे. अल्पवयीन तरुणीचा विनयभंग आणि तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा मोरे यांच्यावर आरोप आहे. आजच्या दिवसात या प्रकरणात  मोरे यांना बसलेला हा दुसरा झटका आहे. निशिकांत मोरे यांनी पनवेल कोर्याकडे संबंधीत प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र, पनवेल कर्टाने त्यांचा जामीन अर्ज आज (9 जानेवारी 2019) फेटाळून लावला. त्यामुळे मोरे यांची अटक आता अटळ ठरली आहे.

 

09 Jan, 23:38 (IST)

राज्याच्या गृहविभागाने निशिकांत मोरे अल्पवयीन तरुणी विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यातील चालक दिनकर साळवे याला निलंबीत केले आहे. निशिंकात मोरे प्रकरणात साळवी याने पीडितेच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा आरोप आहे.

09 Jan, 23:12 (IST)

अल्पवयीन तरुणीचा विनयभंग आणि तिच्यासोबत अश्लिल वर्तन केल्याचा आरोप असलेल्या डीआयजी निशिकांत मोरे यांचा जामीन अर्ज पनवेल कोर्टाने फेटाळला आहे. डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावरील जामीन अर्जावर युक्तीवाद पूर्ण झाल्यावर कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष लागले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी डीआयजी मोरे यांना अटक करणे आवश्यक असल्याची मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली होती.

09 Jan, 22:32 (IST)

रखडलेली मेगाभरती प्रक्रिया आम्ही करणार, असं आश्वासन ठाकरे सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे. मुश्रीफ लोकमत सरपंच अवार्ड कार्यक्रमात एका सरपंच महिलेच्या प्रश्नावर उत्तर देताना बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 72 हजार पदांची मेगा भरती करण्याची घोषणा केली होती. परंतु, महापरीक्षा पोर्टल संदर्भातील गोंधळामुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती.  

 

09 Jan, 22:12 (IST)

विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्येचं शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे शिक्षण देण्याची गरज असल्याचं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता असल्याचंही कोश्यारी यांनी म्हटलं आहे. ते पुण्यातील एमआयटी वल्पड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. 

 

 

09 Jan, 21:45 (IST)

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नाही, असं मत वंचित बहुजन पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणतीही आस्था नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या नावावर उद्योजकांची मदत करत आहेत. ऊसतोड कामगारांच्या नावाखाली सरकार साखर कारखान्यांना मदत करत आहे, असा दावाही प्रकाश आंबेडर यांनी एबीपी माझावर प्रतिक्रिया देताना केला आहे. 

09 Jan, 21:33 (IST)

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमासाठी ते औरंगाबाद येथे आले आहेत. दरम्यान, कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस शिवसेना आमदार तानाजी सावंत अनुपस्थित होते. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सावंत यांन पक्षविरोधी काम केले होते.

09 Jan, 21:31 (IST)

2019 हे वर्ष सन 1901 पासूनचे आत्तापर्यंतचे सातवे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. यंदा नागरिकांनी अनुभवलेल्या टोकाच्या हवामानामुळे 1 हजार 600 हून जास्त बळी गेले आहेत. जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर ही माहिती चिंता निर्माण करणारी आहे. आयएमडीकडून यासंदर्भात चिंता वाढवणारी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

 

09 Jan, 21:09 (IST)

नाशिकमध्ये महावितरण विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील 300 पेक्षा जास्त घरातील विद्युत उपकरणं एकाचवेळी जळून खाक झाली आहेत. अचानक विजेचा दाब वाढल्याने घरातील टीव्ही, फ्रिज, सेट ऑप बॉक्स, मिक्सरसह अनेक उपकरणे जळाली आहेत. या घटनेच्या आवाजामुळे घरातील लोकांचा थरकाप उडाला. विजेच्या सर्व उपकरणांचे नुकसान होऊन त्यातून धूर निघू लागला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सिडको विभागाच्या महावितरण कार्यालयाकडे धाव घेतली. 

09 Jan, 20:51 (IST)

महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर आज धनंजय मुंडे पहिल्यांदाच भगवान गडावर गेले. यावेळी त्यांनी उतणार नाही, मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही, असा शब्द जनतेला दिला आहे. तसेच कोणत्याही गडावरून यापुढे राजकारण होणार नाही, असं आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिलं आहे. 

 

09 Jan, 19:54 (IST)

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करून त्या खऱ्या असल्याचे भासवून तब्बल 71 कोटी 78 लाखांचे गैरव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अनिल भोसले यांच्यासह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

09 Jan, 19:47 (IST)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीचं वृत्त नाकारलं आहे. ते लोकमत दैनिकाच्या 'सरपंच ऑफ दि इअर' कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांना राज ठाकरेंसोबत बैठक झाली का? असं विचारलं असता फडणवीस यांनी सांगितले की, आमच्या भेटी अनेक वेळा झाल्या आहेत. मनसे आणि भाजपा एकत्र येण्याचं कोणतीही चिन्ह नाही. त्यांच्या आणि आमच्या विचारात अतंर आहे. जोपर्यंत विचार आणि कार्यपद्धतीत अंतर आहे, तोपर्यंत आम्ही एकत्र येऊ शकत नाही. मनसेचे विचार आणि कार्यपद्धती बदलल्यास भविष्यात एकत्र येण्याचा विचार करु शकतो, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे. 

Read more


बुधवारी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांचा निकाल लागला. त्यानंतर आज मुंबई महापालिकेच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक 141 मध्ये आज पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी 10 जानेवारीला होणार आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या 

या पोटनिवडणुकीकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपचे बबलू पांचाळ, काँग्रेसचे अल्ताफ काझी, एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमामुद्दिन आणि समाजवादी पक्षाचे जमीर खान या उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement