महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गायक-संगीतकार अदनान सामी यांच्या पद्मश्रीला विरोध; 25 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

. 'वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही' अशा शब्दांत त्यांनी मनसे वर टीका केली आहे.

26 Jan, 04:42 (IST)

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. एकता कपूर, कंगना रनौत, अदनान सामी सोबत 118 व्यक्तींना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. मात्र आता मनसेने अदनान सामी यांच्या पद्मश्रीला विरोध केला आहे. ते 'मूळ भारतीय नागरिक' नाहीत असे म्हणत मनसेकडून हा विरोध केला जात आहे. 

 

26 Jan, 03:39 (IST)

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा खात्यांची अदलाबदली झाली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खातेदेखील सोपवण्यात आले आहे. यापूर्वी ही दोन्ही खाती संजय राठोड यांच्याकडे होती. संजय राठोड यांच्याकडे विजय वडेट्टीवार यांच्याकडे असलेले भूकंप पुनर्वसन खाते सोपवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनंतर राज्यपालांनी हा बदल मान्य केला आहे. 

26 Jan, 02:47 (IST)

प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले, त्यानंतर आता पद्मविभूषणचीही घोषणा करण्यात आली आहे. यावेळी सात व्यक्तींना पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात येईल. पद्मविभूषणने सन्मानित झालेल्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा समावेश आहे. या दोघांनाही मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार मिळाला आहे.

26 Jan, 24:50 (IST)

नवी दिल्ली येथील भजनपुरा परिसरातील एक इमारत कोसळली असून यात  3 विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  तसेच ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 13 जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमनदलाच्या गाड्या दाखल झाल्या असून बचाबकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

एएनआयचे ट्वीट-

 

26 Jan, 24:24 (IST)

भंडारा जिल्ह्यातील बिनाखी शिवारात वाघाने हल्ला केत्यामुळे 3 व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. गावात वाघ शिरल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी एका ठिकाणी जमाव केला. दरम्यान, वाघाने ग्रामस्थांवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत वाघ एका व्यक्तीच्या अंगावर बसलेला दिसत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

एएनआयचे ट्वीट- 

 

25 Jan, 22:57 (IST)

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर करण्यात आले असून 1040 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यात समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्रातील 54 पोलिसांचा यात समावेश आहे. यात 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती वरिष्ठ सेवा पदके मिळाले आहे. तसेच 10 पोलिस अधिकाऱ्यांना शौर्य पदके जाहीर करण्यात आले तर, 40 पोलीस अधिकाऱ्यांना गुणवत्ता सेवा पदके देण्यात आली आहेत

25 Jan, 21:13 (IST)

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने NIA कडे सोपविल्यानंतर विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली. यावर कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “एनआयएमार्फत तपास करायचा होता तर आधीच करायचा होता. मात्र, या प्रकरणी राज्य सरकारनं काही भूमिका घेतली त्यानंतर केंद्रानं आपली भूमिका बदलली,” असं वळसे-पाटील यावेळी म्हणाले. 

25 Jan, 21:01 (IST)

मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याने आपण फार आनंदी आहोत अशी प्रतिक्रिया वाडकरांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. 

 

25 Jan, 19:55 (IST)

मनसे पक्षाची आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांची बदलती भूमिका पाहून अनेक राजकीय पक्षांनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणूकीवेळी राज ठाकरेंवर झालेली ईडीची भूमिका पाहता राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली असावी असा खोचक टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

25 Jan, 19:40 (IST)

भीमा कोरेगाव प्रकरणी  एल्गार परिषदसंदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणाकडे सोपण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एनआयच्या चौकशीवर आक्षेप नोंदवला होता.  यातच शरद पावर यांच्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एनआयएच्या चौकशीत राष्ट्रवादीचे नेतेच एक्सपोज होतील, असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

 

25 Jan, 18:47 (IST)

भीमा कोरेगाव प्रकरणी  एल्गार परिषदसंदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा  करणार आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एनआयच्या चौकशीवर आक्षेप नोंदवला आहे. तसेच हे प्रकरण केंद्र सरकारने अतीघाईने काढून का घेतले? असा प्रश्नही  त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला आहे. 

25 Jan, 18:18 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 अगदी तोंडावर आलेली असताना त्याच धर्तीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या करोल बाग परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात रोड शो करण्यात आला.

25 Jan, 17:56 (IST)

देशभरात आज पेट्रोल सरासरी 17 पैसे आणि डिझेल 19 पैशांनी स्वस्त झाले. कमॉडिटी बाजारात खनिज तेलाचा भाव (यूएस क्रूड) 63 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आहे. या कपातीनंतर पेट्रोल-डिझेल दराचा चालू महिन्यातील नीचांकी स्तर आहे.दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीला इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धयजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने खनिज तेलाचा भाव 71 डॉलर प्रति बॅरल पर्यंत वाढला होता.

25 Jan, 17:26 (IST)

प्रलंबित मागण्या पुर्ण न झाल्याने विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी 12 वीच्या परीक्षेवर बहिष्काराचं शस्त्र उगारलं आहे. मागण्या पुर्ण करा अन्यथा 12 वीच्या परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा विनाअनुदानित, कनिष्ठ विद्यालयाच्या शिक्षकांनी केला आहे. '

25 Jan, 17:14 (IST)

चीन मध्ये  वुहान शहरात कोरोनाव्हायरल झपाट्याने पसरत चालला असून या रोगाना बाधित असलेल्या रुग्णावर उपचार करणा-या डॉक्टराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, लियांग वुडॉंग असे या मृत डॉक्टरांचे नाव असून ते एक शल्यविशारद (Surgeon) आहेत.

25 Jan, 16:43 (IST)

येत्या 7 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. अयोध्येत जाऊन मुख्यमंत्री श्रीरामाचं दर्शन घेऊन शरयू तीरावर आरती देखील करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत हजारो शिवसैनिक अयोध्येत जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच हा आमचा श्रद्धेचा विषय असून याचे राजकारण करू नये असेही ते म्हणाले. 

25 Jan, 15:57 (IST)

मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये देशविरोधी भयानक कट शिजत असल्याचे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यामुळे राज ठाकरेंकडे यासंदर्भात काही माहिती असेल तर ती पोलिसांना द्यावी अशी मागणी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. 

25 Jan, 15:36 (IST)

'एल्गार परिषदेचा' तपास NIA कडे सोपविल्याच्या मुद्दयावर गृहमंत्री डॉ. अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. NIA कड तपास देणं हे चुकीचे असून केंद्र सरकारला कुणाला तरी वाचवायचं आहे असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

 

25 Jan, 15:20 (IST)

मध्य रेल्वे मार्गावर नवीन सार्वजनिक पादचारी पुलाकरिता गर्डर्सच्या लॉंचिंगसाठी शीव व कुर्ला दरम्यान रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा जम्बोब्लॉक 25-26 जानेवारीला रात्री 1 ते पहाटे 4.50 वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक वेळी अप आणि डाऊन धिम्या लाईनवर, अप आणि डाऊन जलद लाईनवर आणि अप आणि डाऊनच्या हार्बर लाईनवर, वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान हार्बर लाईनवर व घाटकोपर/कुर्ला आणि माटुंगा दरम्यान मेन लाईनवर नवीन सार्वजनिक पादचारी पुलासाठी आणि गर्डर्सच्या लॉन्चिंगसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे.

25 Jan, 15:00 (IST)

जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये एन्काऊंटर झाले असून अवंतीपुरा भागात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पोलीसांनी येथी बंदोबस्तात वाढ केली असून येथील परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

Read more


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) 23 जानेवारीला झालेले राज्यव्यापी अधिवेशनाने मनसे पक्षाच्या भविष्यातील वाटचाल कशी असेल याबाबत भूमिका स्पष्ट झाली. मनसेचा नवा झेंडा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्विकारलेली हिंदुत्वाची भूमिका हे जनतेप्रमाणे अन्य राजकीय पक्षांना देखील नवीन होते. या हिंदुत्वाच्या भूमिकेच्या खरपूस समाचार घेत शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 'वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही' अशा शब्दांत त्यांनी मनसे वर टीका केली आहे.

तर दुसरीकडे कोरेगाव भीमा प्रकरणातील सत्य बाहेर येऊ नये आणि ख-या गुन्हेगारांना संरक्षण मिळावे यासाठी NIA कडे पुढील तपास देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

एकूणच आज दिवसभरात कोरेगाव भीमा प्रकरणाबाबत आणखी काय नवीन धागेदोरे सापडतात, तसेच मनसेच्या नव्या भूमिकेबाबत अजून कोणकोणत्या पक्षाकडून टीका होईल किंवा कोणाकडून या भूमिकेचे स्वागत होईल ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now