भीम आर्मी चीफ चंद्रशेखर यांची तिहार तरुंगातून सुटका; 16 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

दिवसभरात घडणाऱ्या ताज्या आणि ढळक घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा लेटेस्टली मराठी प्रयत्न करत आहे. म्हणूनच जोडलेले राहा लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग अपडेट सोबत.

17 Jan, 04:44 (IST)

भीम आर्मी चीफ चंद्रशेखर यांची तिहार तुरूंगातून सुटका झाली आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायदा मागे घेऊपर्यंत आमीची चळवळ कायदेशीरदृष्ट्या सुरूच राहील. जे लोक देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहेत, आम्ही अशा लोकांच्या विरोधात आहोत. तसेच उद्या दुपारी १ वाजता जामा मशिदीला भेट देईन. त्यानंतर रविदास मंदिर, गुरूद्वार येथेही भेट देण्यार असल्याची माहिती, चंद्रशेखर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला त्यावेळी दिली.

एएनआयचे ट्वीट-

 

 

17 Jan, 02:45 (IST)

नागरीकत्व दुरूस्ती कायदा (CAA) हा संपूर्ण देशभरात लागू झाला असून या कायद्याला अजूनही अनेक राज्यातून विरोध दर्शवला जात आहे.  यातच वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मुंबई येथील दादर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात नुकतीच वंचित बहुजन आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. 

17 Jan, 02:35 (IST)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगली येथील माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सातारा शहरात जाहिर बंद पाळण्यात आला होता. यातच उद्या 17 जानेवारी रोजी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली बंदचे आवाहन केले आहे.

17 Jan, 01:48 (IST)

भाजप नेते नारायण नाणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. यापुढे संजय राऊत छत्रपतींच्या वंशजांबद्दल काहीही वेडेवाकडे बोलले, तर त्यांची जीभ जागेवर राहणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

17 Jan, 24:55 (IST)

'महाराष्ट्र सरकारला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवायची आहे, त्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत. परंतु रुग्णालयाला देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत', अशा शब्दांत वाडिया हॉस्पिटलसाठीच्या निधीवरुन हायकोर्टाने मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला झापले. 

16 Jan, 23:36 (IST)

जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu - Kashmir Police) गुरुवारी 5 दहशतवाद्यांना (Terror Pperatives) अटक केली आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2020) निमित्ताने, या दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. असे सांगितले जात आहे की, हे लोक 26 जानेवारीला ग्रेनेडने हल्ला करण्याची तयारी करत होते. आता या पाच जणांना पोलिसांनी अटक करून त्यांचा कट उधळून लावला आहे. 

16 Jan, 22:54 (IST)

सीबीआयने अदानी एन्टरप्रायजेस लिमिटेड, तत्कालीन अध्यक्ष वीरेंद्र सिंह, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ, जीपी गुप्ता, तत्कालीन एमडी, एनसीसीएफ, एससी सिंघल, तत्कालीन वरिष्ठ सल्लागार, एनसीसीएफ आणि इतरांवर गुन्हेगारी कट, फसवणूक आणि सार्वजनिक नोकरदारांकडून गैरवर्तनाबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

16 Jan, 21:55 (IST)

संजय राऊत यांनी जे विधान केले आहे त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्येक विधान हे त्या त्या संदर्भाने तपासून पाहायला हवे. कोणताही शिवसैनिक इंदिरा गांधी यांचा अवमान करु शकत नाही. कारण, स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच इंदिरा गांधी यांचा आदर करत असे पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

16 Jan, 21:42 (IST)

संजय राऊत यांनी दाऊद इब्राहीमबद्दल जे वक्तव्य केले आहे त्यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मिष्कील भाष्य करत टोला लगावला आहे. संजय राऊत यांच्यासारखे महान व्यक्तीमत्व भारतात आहे हे देशाचे भाग्य आहे. राऊत यांनी दाऊदला जो दम दिला त्यावरुनच 'दम बिर्याणी' हे नाव पडले आहे. ते इतके महान आहेत की, आता तर ते इराण आणि अमेरिका वादातही मध्यस्थी करु शकतील, अशी मिष्कील टिप्पणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

16 Jan, 21:24 (IST)

संजय राऊत यांच्या छत्रपतींच्या वंशजांबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याचा निषेध करत उद्या (17 जानेवारी 2020) संगली बंदचे अवाहन शिवप्रतिष्ठानने केले आहे. तर, संजय राऊत यांना खासदार पदावरुन मुक्त करावे अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केले आहे.

16 Jan, 21:16 (IST)

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या प्रकाशनावरुन निर्मण झालेला वादावर कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा आपली भूमीका व्यक्त केली आहे. महाराजांच्या नावाने केले जाणारे राजकारण हे अत्यंत वाईट आहे. संजय राऊत यांनी केलेले विधानही अत्यंत वेदनादाई आहे. जे शरद पवार आज किंवा काल परवा बोलत आहेत ते मी गेली 15 वर्षे बोलत आहे. रामदास स्वामी हे शरद पवार यांचे गुरु असूच शकत नाहीत. जिजाऊ याच शिवाजी महाराज यांच्या गुरु होत्या आणि संत तुकाराम महाराज हेही त्यांचे गुरु होते. हे दोनच त्यांचे गुरु होते. शिवाजी महाराज यांना तिसरा गुरुच नव्हता, असेही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

16 Jan, 20:43 (IST)

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांनी रशियाच्या संसदेसमोर राज्यघटनेत बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार व्लादिमीर पुतिन यांचा रशियाचे राष्ट्रपती म्हणून तहहयात राष्ट्रपती राहण्याचा मानस आहे. पुतीन यांचा प्रस्ताव न पटल्याने पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev) यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळानेच राजीनामा दिला आहे.  पुतीन यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणानंतर  मेदवेदेव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात रशिया बऱ्याच मोठ्या संघर्षातून जाण्याची शक्यता दिसत आहे. तसेच, पुतिन आपली सत्ता कायम राखणार का याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

16 Jan, 20:38 (IST)

राज्यातील वातावरण हिताचं नाही. राज्यातील शिवप्रेमींनी बाहेर आलं पाहिजे. संजय राऊत हे आज छत्रपतींच्या वारसासंदर्भात बोलले आहेत. उद्या ते आणखी आमच्या अस्मतेबद्दल बोलतील. म्हणूनच राज्यातील वातावरण हिताचं नाही. राज्यातील शिवप्रेमींनी त्याविरोधात बाहेर आलं पाहिजे, असं नितेश राणे यांनी म्हटले आहे.

16 Jan, 19:57 (IST)

 

बीसीसीआयने खेळाडूंची करार यादी जाहीर केली आहे. ही यादी ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी आहे.  एकूण चार श्रेणीसाठी ही यादी जाहीर होत असते. या यादीत एमएस धोनी याला डच्चू देण्यात आले आहे. तर, मागील वर्षी प्रमाणे नव्या यादीमध्ये यंदाही विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीनच खेळाडूंना ए+ श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. एकूण 11 खेळाडूंचा ए श्रीणीत, 5 खेळाडू बी श्राणी आणि 8 खेळाडू सी ग्रेड श्रेणीमध्ये आहेत. 

16 Jan, 19:50 (IST)

बीसीसीआयच्या करार यादीतून एमएस धोनी याचे नाव नाही. धोनी हा गेल्या वर्षी बीसीसीआयच्या यादीत होता. मात्र, या  वेळी धोनीचे नाव बीसीसीआयच्या कोणत्याही यादीत नाही. प्राप्त माहितीनुसार बीसीसीआयच्या एकूण 4 करार याद्या असतात. त्यापैकी एकाही यादीत धोनी याचे नाव नाही. बीसीसीआय प्रत्येक वर्षी खेळाडूंच्या कराराची यादी प्रसिद्ध करत असते. यात धोनी याचे नाव आढळले नाही. त्यामुळे धोनीला बीसीसीआयने निवृत्तीचे संकेत तर दिले नाहीत ना? असा सवाल उपस्थित केला जात  आहे. 

16 Jan, 19:46 (IST)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले विधान चुकीचे होते. आता त्यांनी ते विधान मागे घेतले आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे, असे सांगत कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही महापुरुष अथवा व्यक्तीबाबत कोणतेही विधान करताना काळजी घ्यावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

16 Jan, 19:21 (IST)

संजय राऊत यांनी इंदिरा गांधी आणि करिम लाला यांच्या भेटीवरून केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ माजला होता. मात्र आज संजय राऊत यांनी माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा इंदिरा गांधींच्या प्रतिमेला धक्का पोहचला असेल तर मी ते वक्तव्य मागे घेतो. असे म्हणत नरमाईची भूमिका घेतली आहे. 

16 Jan, 18:23 (IST)

संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेले विधान मागे घ्यावे असे ट्विट संजय निरुपम यांनी केले आहे. दुसऱ्या बाजूला  मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही इंदिरा गांधी या देशभक्त होत्या.  त्यामुळे काँग्रेस नेत्यांबाबत ट्विट करताना इतर पक्षांच्या नेत्यांनी काळजी घ्यावी असा सल्ला राऊत यांना दिला आहे.

पीटीआय ट्विट

16 Jan, 18:13 (IST)

भारताच्या नकारामुळे आशिया कप पाकिस्तानात होणार नाही. भारताच्या भुमीकेमुळे पाकिस्तानला जोरदार धक्का बसला आहे. सुरक्षेच्या कारणावरुन पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळला जाणार नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान, बांग्लादेश, दुबई किंवा श्रीलंका येथे आशिया कप स्पर्धेचे आयोजन होण्याची शक्यता

16 Jan, 17:55 (IST)

वेळ जुळून आली की सगळं होत असतं असं सांगत महाराष्ट्राची सत्ता योग्य वेळी आपल्या हाती आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. बारामती येथे आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटनही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

Read more


आज के शिवाजी नरेंद्र मोदी (Aaj ke Shivaji Narendra Modi) पुस्तकावरुन झालेला वाद. त्यावर राजकीय पक्षांनी घेतलेल्या भूमिका. त्याचे पडसाद. भाजपची झालेली कोंडी. विविध संघटना, राजकीय नेते आदींनी केलेली मतमतांतरं यांवरुन गेले दोन दिवस राज्याच्या राजकारणात प्रचंड गदारोळ माजला आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेली टीका. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी घेतलेली पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना (Shiv Sena) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेली टीका यावरुन हा वाद पुन्हा एकदा वाढला. उदयनराजे भोसले यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथील माण-खाटाव येथे तर, संजय राऊत यांनी पुणे येथे जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यावरुन पुन्हा एकदा राजकारणत तापले असून, भाजपने संजय राऊत यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे.

दुसऱ्या बाजूला राज्यातील शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांकडू होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने स्वत:चीच सरकारी पीक विमा कंपनी काढण्याचा निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत केलेला विचार. महावितरण कंपणीने तब्बल सहा हजार कोटी रुपयांची दरवाढीचा प्रस्ताव देऊन समान्य ग्राहकांना दिलेला झटका. राज्यात विविध ठिकाणी वाढलेली थंडी. त्याचा शेती, आरोग्य आणि पर्यावरण यांच्यावर होणारा परिणाम यांसह वाढती महागाई आणि शेअर बाजार, क्रीडा, अर्थकारण, राजकारण आणि उद्योगविश्वातील घडामोडींचा दिवसभारातील धांडोळा लेटेस्टलीच्या वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. (हेही वाचा, महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात 2 कोटी 79 लाखांचा खर्च)

दरम्यान, राज्य, देश यांसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरही काय घडतंय.. काय बिघडतंय या सर्व गोष्टींवर लेटेस्टली नजर ठेऊन आहे. त्यामुळे अमेरिका-ईराण (US-Iran Conflict) यांच्यातील संघर्ष काय रुप घेतो आहे. प्रामुख्याने रशिया (Russia) येथे आज काय घडतं आहे? कारण इथे घटनादुरुस्ती प्रस्तावावर पेच निर्माण झाल्याने रशियाचे सरकारच विसर्जित झाले आहे. त्यामुळे इथले राजकारण कसे वळण घेते याकडेही लक्ष असणार आहे. सत्तासूत्र काय ठेवण्याची खेळी विद्यमान राष्ट्राध्यक्ष पुतीन (Vladimir Putin) यांना जमणार की कसे? या आणि यांसह दिवसभरात घडणाऱ्या ताज्या आणि ढळक घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा लेटेस्टली मराठी प्रयत्न करत आहे. म्हणूनच जोडलेले राहा लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग अपडेट सोबत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now