परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द, लाहोर हायकोर्टचा मोठा निर्णय; 13 जानेवारी 2020 च्या ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना करणारे पुस्तक रविवारी भाजपकडून प्रकाशित करण्यात आले. मात्र पुस्तक प्रकाशनानंतर त्यावरुन वाद सुरु झाले असून मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊच शकत नाही अशी जोरदार टीका करण्यात येत आहे.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना विशेष कोर्टाकडून देशद्रोहाच्या खटल्यात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आज लाहोर हायकोर्टाकडून ही शिक्षा रद्द करण्यात आली आहे.
भाजप महाराष्ट्र या ट्विटर हॅण्डलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, भाजप कार्यकर्ते संजय मयूख यांनी म्हटले आहे की, "'आजके शिवाजी, नरेंद्र मोदी' हे पुस्तक एका व्यक्तीने लिहिले आहे, आणि ते त्यांचं लेखन आहे. हे पक्षाचे प्रकाशन नाही. आमचा या पुस्तकाशी काही संबंध नाही. हे पुस्तकाच्या लेखकांनी देखील सांगितले आहे. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही हे पुस्तक मागे घेत आहोत."
उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीतील मुद्द्यांविषयी, आदित्य ठाकरे यांनी आज ट्विट केले आहे. ते लिहितात, "महाराष्ट्रातील गृहनिर्माण पॉलिसीला चालना मिळावी हा बैठकीचा मुख्य हेतू होता. तसेच मुंबईमध्ये SRA, म्हाडा, बी.डी.डी. प्रकल्पांना वेग देण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत."
परळ मधील वाडिया रुग्णालय हे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मात्र नुकतीच गटनेत्यांनी त्या संदर्भात बैठक पार पडली असून, जानेवारी 14 रोजी (उद्या) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वाडियासंदर्भात हे महत्त्वाची बैठक घेणार आहेत. त्यामुळे उद्याच याबद्दल निर्णय येण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाडिया रुग्णालय बंद पाडणे हा एक डाव असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी हा हॅशटॅग वापरात पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. या हॅशटॅगचा वापर करत, छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर मावळा तानाजी मालुसरे जसा होता त्याचप्रमाणे आपणही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मावळे आहोत, असा निर्धार मनसेच्या कार्यकर्त्यांचा सध्या सोशल मीडियावर दिसून येत आहे.
आज के शिवाजी, नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर देशभरातून निषेद व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान मोदींची तुलना शिवरायांशी केल्याने संजय राऊत यांनी काल महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया विचारली होती. यावर, उदयनराजे यांनी आज ट्विट करत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सांगणार असल्याचे म्हटले आहे. ते लिहितात, "‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर उद्या मंगळवार दि १४ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता रेसिडन्सी क्लब, पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सडेतोडपणे आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत."
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मला दुचाकी चालवण्याची सवय नाही, पण सध्या तीन चाकी कार नाही पण सरकार चालवतो आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियानात केले आहे. यावर अद्याप विरोधी पक्षातील नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
वाडिया आणि सत्ताधारांचा संगनमताने रुग्णालय बंद करण्याची वेळ आल्याचा आरोप भाजप आमादार आशिष शेलार यांनी केला आहे. तर निधी अभावी बंद करण्यात आलेली कामे पुन्हा सुरु करण्याची जबाबदारी ही महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची आहे. पण जर असे न झाल्यास भाजप मोठे आंदोलन करणार असून रुग्णालय बंद होऊ देणार नाही आहे.
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाच्या निषेधार्थ 14 जानेवारीला मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसचे आंदोलन करणार असल्याची अधिक माहिती काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
सोलापूर फौजदारी चावडी ठाण्यात 'आज के शिवाजी नरेंद्र' पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर जगदाळे नावाच्या व्यक्तीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई विमानतळावर एका व्यक्तीकडून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला असून त्याने पार्किंगच्या येथे असलेल्या इमारतीवरुन उडी मारली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.
पक्षाने आदेश दिल्यास 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक मागे घेणार असल्याचे लेखल जयभगवान गोयल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रकारे काम करतात. त्याच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करत असल्याने आपण मोदी यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असे गोयल यांनी म्हटले आहे.
आज के शिवाजी नरेंद्रे मोदी या पुस्तका वरुन संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच या पुस्तकाच्या विरोधात राज्यभरातून विरोध दर्शवला जात आहे. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जसे निर्णय घ्यायचे, त्याप्रकारे नरेंद्र मोदीही निर्णय घेतात, असे या पुस्तकात लिहण्यात आले आहे. यामुळे राज्यभरातून या पुस्तकाच्या विरोधात अंदोलने केली जात आहेत
पंढरपुरातील प्रसिद्ध उद्योजक महालक्ष्मी फर्निचरचे मालक सागर दोशी यांचे अपघातात निधन झाले आहे. सागर दोषी आपले काम आटपून घरी परत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांचे वाहन रस्त्यावर पलटले. यात सागर दोषी यांचा जागेवरच मृत्यू झाला. सागर दोषी यांच्यासह वाहनात असलेले 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यार्थ्यांचे कुलगुरु नजमा अख्तर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु करुन निषेध व्यक्त केला आहे. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी परीक्षेची तारीख पुन्हा ठरवावी, पोलिसांविरोधात एफआयआर नोंदवावा आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितता द्यावी अशी मागणी करत आहेत.
मुंबईतील लहान मुलांच्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या वाडिया रुग्णालयाबाबतचा वाद मिटवून रुग्णांसाठी पुन्हा सुरु करा असा इशारा आमदार आशिष शेलार यांनी महापालिकेला दिला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना पत्र पाठवले आहे.
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन पुणे फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. तसेच छत्रपती शिवजी महाराज यांची तुलना केल्याने लेखक आणि नरेंद्र मोदी निषेध करण्यात येत आहे. तसेच या पुस्तकाला राज्यभरातून विरोध दर्शवला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवरायांसोबत तुलना केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. तर नाशिक येथे 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तक प्रकाशनाच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन सुरु करण्यात आले आहे. त्याचसोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून भाजप नेत्यांचे बॅनर सुद्धा जाळण्यात येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना करणारे पुस्तक रविवारी भाजपकडून प्रकाशित करण्यात आले. मात्र पुस्तक प्रकाशनानंतर त्यावरुन वाद सुरु झाले असून मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊच शकत नाही अशी जोरदार टीका करण्यात येत आहे. या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे पुस्तकाचे नाव ठेवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी सर्वप्रथम टीका केल्या तर आता खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
छत्रपती शिवाजी महाराज हे शिवप्रेमींचे आराध्य दैवत असून त्यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्यासोबत करणे म्हणजे भावनांचा अवमान असल्याचे बोलले जात आहे. तर संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरील महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत?हेच ते जयभगवान गोल असून त्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांचया महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!! अशी टीका केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)