केंद्रशासित प्रदेश बनलेल्या जम्मू कश्मीर, लद्दाख मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन 2019 चं दणक्यात सेलिब्रेशन
जम्मू कश्मीरमधून कलम 370 आणि 35A हटवल्यानंतर जम्मू कश्मीर आणि लद्दाख हे दोन प्रदेश आता केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आहे.
जम्मू कश्मीरमधून (Jammu & Kashmir) कलम 370 आणि 35A हटवल्यानंतर जम्मू कश्मीर आणि लद्दाख (Ladakh) हे दोन प्रदेश आता केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर जम्मू कश्मीर आणि लद्दाख मध्ये यंदा भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. भाराताच्या इतर राज्यांप्रमाणेच या भागातही रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कश्मीरमध्ये राज्यपाल सत्यपाल मलिक, अजित डोभाल यांच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा रंगला. भारतीय लष्करात होणार 'चीफ ऑफ डिफेन्स' पदाची निर्मिती; स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील IMP मुद्दे
जम्मू कश्मीर पासून वेगळ्या झालेल्या लद्दाखमध्येही यंदा स्वातंत्र्य दिनाचं सेलिब्रेशन खास रंगलं. काही दिवसांपूर्वी संसदेत दमदार भाषणाने वाहवा मिळवलेले भाजपा खासदार आणि तरूण, तडफदार नेतृत्त्व Jamyang Tsering Namgyal यांनी पारंपारिक वेषभूषेत, नाच-गाण्याचा आनंद घेत केंद्रशासित लद्दाखचा पहिला स्वातंत्र्यदिन सोहळा सेलिब्रेट केला.
जम्मू कश्मीर मधील सेलिब्रेशन
लद्दाख मधील सेलिब्रेशन
जम्मू कश्मीर आणि लद्दाख मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त पोलिसफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र अशा वातावरणामध्येही लोकांनी उत्स्फुर्तपणे नागरिकांनी भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा सेलिब्रेट केला. श्रीनगर के शेर-ए-कश्मीर स्टेडियममध्ये ध्वजारोहण करण्यात आले.