Jammu & Kashmir DDC Poll Results 2020: जम्मू कश्मीरमध्ये गुपकर आघाडी बहुमताकडे, 74 जागा मिळवत भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष
भाजपला एकूण 74 जागा मिळाल्या. त्यापैकी जम्मू प्रांतात भाजपला 71 जागा मिळाल्या. तर गुपकर आघाडीला 35 जागा मिळाल्या. काँग्रेसने या प्रांतात 17 जागा मिळवल्या. एकूण 280 जागांसाठी 20 जिल्ह्यात प्रत्येकी 14 जागांसाठी मतदान पार पडले.
जम्मू कश्मीर जिल्हा विकास परिषद निवडणूक 2020 (Jammu & Kashmir DDC Poll Results 2020) मध्ये फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्या नेतृत्वाखालील गुपकर आघाडी (Gupkar Alliance) आणि काँग्रेस(Congress) पक्षाने मिळून 20 पैकी 13 जिल्ह्यांमध्ये मोठा विजय मिळवला आहे. जम्मू कश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडली. यात गुपकार आघाडीला सर्वात अधिक 100 जागा मिळाल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) 74 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
जम्मू कश्मीर जिल्हा विकास परिषद निवडणूक 2020 मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला एकूण 74 जागा मिळाल्या. त्यापैकी जम्मू प्रांतात भाजपला 71 जागा मिळाल्या. तर गुपकर आघाडीला 35 जागा मिळाल्या. काँग्रेसने या प्रांतात 17 जागा मिळवल्या. एकूण 280 जागांसाठी 20 जिल्ह्यात प्रत्येकी 14 जागांसाठी मतदान पार पडले. या मतदानासाठी निवडणूक कार्यक्रम एकूण 25 दिवस पार पडला. (जम्मू-कश्मीर बाबतच्या अनेक बातम्यांसाठी हेही पाहा)
सविस्तर निकाल
पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले की, हे स्पष्ट आहे की, या भागातील लोकांनी गुपकर आघाडीला मतदान केले आहे. कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा “असंवैधानिक” निर्णय नाकारला आहे.