Jammu - Kashmir Accident: CRPF जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात, 8 जण जखमी
सीआरपीएफ जवान एका वाहनातून बालटाल मार्गावरून अमरनाथ यात्रेकडे जात होते. याच दरम्यान त्यांच्या वाहनाला अपघात झाला.
जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सीआरपीएफ जवानांच्या वाहनाला मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सीआरपीएफ (CRPF) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला सिंध नाल्याजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये सीआरपीएफचे आठ जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जम्मू -काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात रविवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) वाहनाला हा अपघात झाला. (हेही वाचा - Mumbai Viral Video: मुंबईत सेल्फीच्या नादात महिलेचा मृत्यू, मुलांच्या डोळ्यादेखत आई वाहून गेली)
जखमी जवानांना नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सीआरपीएफ जवान एका वाहनातून बालटाल मार्गावरून अमरनाथ यात्रेकडे जात होते. याच दरम्यान त्यांच्या वाहनाला अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना बालटाल बेस कॅम्प रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
सध्या पवित्र अमरनाथ यात्रा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेवरील दहशतवादाचा धोका पाहता प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमरनाथ यात्रा अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठ्या संख्येने CRPF जवान तैनात करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी ही पाऊलं उचलण्यात आली आहेत.