Jammu and Kashmir, Haryana Assembly Elections Results 2024: जम्मू-कश्मीर मध्ये कोणाचे सरकार? हरियाणा पुन्हा BJP की काँग्रेसला संधी? आज फैसला
दोन्ही राज्यांमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे उत्सुकता आहे.
जम्मू-कश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी (Jammu and Kashmir, Haryana Assembly Elections Results 2024) आज (8 ऑक्टोबर) पार पडत आहे. दोन्ही राज्यांमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे उत्सुकता आहे. कश्मीरमध्ये पाठिमागील 10 वर्षांमध्ये प्रथमच निवडणुका पार पडत आहेत. तर हरियाणामध्ये पाठिमागील काही वर्षांपसून भाजपची सत्ता आहे. या वेळी काँग्रेस पक्षाने या राज्यात जोर लावला आहे. त्यामुळे इथे सत्तांतर होणार का आणि जम्मू कश्मीरची जनता कोणाला साथ देणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. जम्मू कश्मीरमध्ये 63.45% मतदान झाले आहे. या ठिकाणचा थेट सामना काँग्रेस विरुद्ध भाजप असा होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अर्थात पीडीपी आणि इत्तेहाद पार्टी यांसारखे स्थानिक पक्षही रिंगणात आहेत. जे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. एक्झिट पोल्सचे अंदाज आले असले तरी त्यामध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही.
हरियाणा आणि जम्मू-कश्मीर निवडणूक निकाल महत्त्वाचे मुद्दे
- जम्मू कश्मीरमध्ये एकूण 90 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. त्यापैकी 46 हा बहुमताचा जादूई आकडा आहे. जो पक्ष तो पार करेल त्याची सत्ता हे निश्चित आहे. जनता कोणाला कौल देते याबाबत उत्सुकता आहे.
- हरियाणामध्ये पाठिमागचे 10 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. त्यामुळे आता होत असलेल्या निवडणुकीत या राज्याची जनता पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षावर विश्वास ठेवते की, काँग्रेसला हात देत बदल घडवते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
- हरियाणामध्ये एकूण 90 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये एकूण 1,031 उमेदवार मैदानात आहेत. त्यापैकी 464 अपक्ष उमेदवार आहेत. महिला उमेदवारींची संख्या 101 इतकी आहे. या राज्यात 5 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. (हेही वचा, Assembly Election Results 2024 On Tv9 Marathi: हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार; जनता कोणाला देणार कौल? 'येथे' पहा निकालाचे Live Streaming)
दरम्यान, जम्मू कश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यांतील जनता कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकते याबातब प्रचंड उत्सुकता आहे. देशाच्या राजकीय वर्तुळाचेही या मतमोजणीकडे लक्ष लागले असून, येणाऱ्या निकालाचा परिणाम देशातील नजिकच्या राजकारणावर पाहायला मिळू शकतो. सध्ये केंद्रातील एनडीए सरकार हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूवर आधारलेले आहे. हरियाणा आणि जम्मू-कश्मीर राज्यांतील निकाल विरोधात केला तर केंद्रातील भाजप सरकार प्रचंड दबावाखाली येऊ शकते. शिवाय महाराष्ट्रत आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवरही त्याचा भाजप आणि महायुतीसाठी प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला या निवडणुका भाजपने जिंकल्यास नेतृत्वाचा आणि पर्यायाने सरकारचाही आत्मविश्वास दुणावू शकतो.