Jammu and Kashmir मध्ये कुलगाम, अनंतनाग जिल्ह्यात चकमकीत जैश - ए - मोहम्मदच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश
यामध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यापैकी चौघांची ओळख पटवण्यात यश आलं आहे.
जम्मू कश्मीर (Jammu and Kashmir) मध्ये कुलगाम (Kulgam) आणि अनंतनाग (Anantnag) मध्ये 6 दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा करण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. कश्मीरच्या स्थानिक पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे जैश - ए - मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी होते.
बुधवार (29 डिसेंबर) च्या संध्याकाळी दक्षिण काश्मीर मध्ये असणार्या दोन जिल्ह्यांमध्ये पोलिस, सुरक्षा यंत्रणा यांनी कारवाई सुरू केली होती. यामध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यापैकी चौघांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. 2 जण पाकिस्तानी असून इतर दोघे स्थानिक आहेत.तर अन्य दोन दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Jammu kashmir Update: अवंतीपोरामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचा कमांडर शाम सोफी ठार .
ANI Tweet
अनंतनाग मध्ये नवगाम या भागात झालेल्या चकमकीमध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनंतनाग नंतर कुलगाम मधील मिरहामा येथे देखील चकमक सुरू झाली. दरम्यान जम्मू कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये या दहशतवाद्यांचा टेरर क्राईम म्हणजेच दहशतवादी कारवाया आणि स्थानिकांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग होता.
एकूण कारवाईमध्ये 33 आर्मी जवान अणि एक जम्मू कश्मीर पोलिस जवान जखमी झाले होते. नंतर एक आर्मी जवान शहीद झाला असून अन्य लोकांची स्थिती स्थिर आहे. IGP Kashmir, Vijay Kumar यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून 2 M4रायफल्स आणि चार AK47 जप्त करण्यात आली आहेत.