Jammu News: प्रेयसीची हत्या केल्यावर आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरु

ही घटना जम्मू-कश्मीरमधील जम्मू (Jammu) शहरात घडली. पेशाने डॉक्टर असलेल्या आपल्या मैत्रिणीवर आरोपीने स्वयंपाकघरातील चाकूने वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमेधा शर्मा (Sumedha Sharma) असे हत्या झालेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे

Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Crime News: प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना जम्मू-कश्मीरमधील जम्मू (Jammu) शहरात घडली. पेशाने डॉक्टर असलेल्या आपल्या मैत्रिणीवर आरोपीने स्वयंपाकघरातील चाकूने वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमेधा शर्मा (Sumedha Sharma) असे हत्या झालेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. ती जम्मूतील तलब टिल्लो येथील येथील रहिवासी आहे. तर जोहर गनई असे आरोपीचे नाव आहे. तो जम्मूतील जानीपूर (Janipur) येथील राहणारा आहे.

दरम्यान, आरोपी तरुणावर जम्मूतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आोरपी जोहर गनई याने आपल्या फेसबुकवर पोस्टकेली होती. त्यात आपल्या काही व्यक्तीगत अडचणी आणि समस्यांमुळे आपण आयुष्य संपवत असल्याचे म्हटले होते. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीच्या घरात प्रवेश केला असता आरोपी रक्ताच्या थारेळ्यात पडलेला आढळला. त्याच्या पोटावर जखमा होत्या. पोलिसांनी आोरपी आणि पीडिता या दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, सुमेधा हिचा गंभीर दुखापतीमुळे उपचारापूर्वीच मृत्यू झाला. (हेही वाचा, Jammu and Kashmir: भारत-पाकिस्तान सीमेवर उभारला जाणार Chhatrapati Shivaji Maharaj यांचा पुतळा; भूमिपूजनासाठी LOC वर नेली जाणार किल्ल्यांवरील माती आणि पाणी)

पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, भारतीय दंड संहिता (IPC) कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. अधिक माहिती अशी की, आरोपी आणि पीडिता एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. दोघांनी जम्मूमधील दंत महाविद्यालयात बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस) कोर्स केला होता. पुढे पीडित सुमेधा दंत शस्त्रक्रियेत पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी जम्मूच्या बाहेर गेली. दरम्यान, ती 7 मार्च रोजी होळीसाठी घरी आली होती. घटना घडली तेव्हा ती तिच्या प्रियकराच्या घरी होती. जिथे त्यांनी कथितपणे भांडण केले, त्यानंतर आरोपींनी तिच्यावर चाकूने वार केले. वैद्यकीय-कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर पीडितेचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.