Jama Masjid Row: दिल्ली च्या जामा मशिदीमध्ये महिलांना बंदी हे 'महिलांच्या हक्कांचे उल्लंघन'; Delhi Commission for Women ची इमामांना नोटीस
शाही इमामाने नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्यांना हा आदेश लागू नसल्याचे सांगितले आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या (Delhi Commission for Women) अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी आज (24 नोव्हेंबर) प्रसिद्ध जामा मशिदीमध्ये (Jama Masjid) महिलांना एकट्याने किंवा समूहात येण्यावर घातलेल्या निर्बंधाची दखल घेतली आहे. त्यांनी आज जामा मशिदीच्या शाही इमामांना (Jama Masjid Shahi Imam) नोटीस जारी केली आहे. मशिदीच्या प्रशासनाने मुख्य गेट्सबाहेर ‘मुलींना’ प्रवेशबंदीच्या नोटिसा लावल्या आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे काहींनी नाराजी बोलून दाखवल्याने, शाही इमामाने नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्यांना हा आदेश लागू नसल्याचे सांगितले आहे.
शाही इमाम सय्यद अहमद बुखारी (Syed Ahmed Bukhari) यांच्या म्हणण्यानुसार, जामा मशिद हेरिटेज वास्तूच्या परिसरात काही 'घटना' निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. "जामा मशीद हे प्रार्थनास्थळ आहे आणि त्यासाठी लोकांचे स्वागत आहे. पण मुली एकट्या येतात आणि त्यांच्या 'Dates'ची वाट पाहत असतात. हे ठिकाण अशा गोष्टींसाठी नाही म्हणून त्यांच्यावर बंधनं आहेत." असे बुखारी म्हणाले.
"अशी कोणत्याही जागा, मग ती मशीद, मंदिर किंवा गुरुद्वारा हे प्रार्थनास्थळ आहे आणि त्यासाठी कोणाला येण्यावर कोणतेही बंधन नाही. आजच 20-25 मुलींच्या गटाने भेट दिली आणि त्यांना प्रवेश करण्यास परवानगी दिली," असेही बुखारींनी स्पष्ट केले. नक्की वाचा: Demands Survey of Jama Masjid: ज्ञानव्यापी आणि मथुरेनंतर भोपाळच्या जामा मशिदीखाली शिवमंदिर असल्याचा दावा; पुरातत्व सर्वेक्षणाची मागणी .
पहा ट्वीट
दिल्ली महिला आयोगाने मात्र जामा मशिदी बाहेरील पाटी हा स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं सांगत इमामांना नोटिस बजावली आहे. त्यांनी उचललेले हे असंवैधानिक पाऊल आहे. त्यांना वाटते की हा इराण आहे, जिथे ते महिलांशी भेदभाव करू शकतात आणि कोणीही काहीही बोलणार नाही. स्त्रीला पुरुषाप्रमाणे प्रार्थना करण्याचा समान अधिकार आहे. DCW बंदी हटवेल असा विश्वास स्वाती मालीवाल यांनी व्यक्त केला आहे.