जयपूर: गर्भवती महिलेने एकाच वेळी दिला 5 बाळांना जन्म, एकाचा मृत्यू
मात्र या प्रकरणी एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मते, तीन बाळांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
राजस्थान( Rajasthan) मधील जयपूर येथील एका महिलेने एकसाथ पाच बाळांना जन्म दिला. मात्र या प्रकरणी एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मते, तीन बाळांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच अजून एक बाळ वेंटिलेटवर आहे.सांगानेर येथे असलेल्या रुखसाना या गर्भवती महिलेने एकाच वेळी पाच मुलांना जन्म दिला. रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. लता राजौरिया यांनी असे म्हटले की, रुखसाना हिची प्रकृती पुर्णपणे ठिक आहे. परंतु एक नवजात बालक मृत जन्माला आले. उर्वतरित चार बालकांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
तसेच नऊ महिन्यांपूर्वी बालकांना जन्म दिल्याने चार जणांचे वजन अत्यंत कमी आहे. त्यामुळेच त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यामध्ये दोन मुली आणि दोन मुलांना रुखसाना हिने जन्म दिला आहे. तर मृत नवजात बालक मुलगा होता. सर्व नवजात बालकांचे वजन 1.4 किलोग्रॅम दरम्यान आहे. यामुळेच सर्व बालकांची सर्वोतोपरी काळजी डॉक्टरांकडून घेण्यात येत आहे.(सोलापूर: अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार, निर्मनुष्य स्थळी नेऊन वारंवार केला तिच्यावर बलात्कार)
तर काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील 20 दिवसांच्या जुळ्या मुलींचे अर्भक तलावात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. परंतु खुद्द मुलींच्या पालकांनी त्यांचे अपहरण झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. परंतु पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपीं पालकांना अटक केली. तसेच तलावात फेकलेल्या अर्भकांना सुद्धा बाहेर काढण्यात आले. परंतु पालकांनी या दोन्ही मुलींना तलावात फेकल्याच्या घटनेवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता.