IPL Auction 2025 Live

Jains saved 124 goats from Bakrid Sacrifice in Delhi: दिल्ली मध्ये जैन मुलांनी मुस्लिम असल्याचं भासवत खरेदी केले 124 बकरे; बकरीद ला 'कुर्बान' होण्यापासून वाचवले!

त्यानंतर जैन समजातील मंडळी आपण मुस्लिम आहोत असे भासवून त्यांना खरेदी केले.

Bakrid | pixabay.com

बकरीद (Bakrid) च्या दिवशी मुस्लिम बांधव बकर्‍याची कुर्बानी देऊन हा सण साजरा करतात मात्र सणांच्या सेलिब्रेशन मध्ये अशा प्रकारे मुक्या प्राण्यांचा बळी देण्याबाबत समाजात मतमतांतर आहेत. यंदा ईदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जामा मशिदी (Jama Masjid) पासून काही अंतरावर 124 बकर्‍यांना ईद  दिवशी कुर्बान (Bakrid sacrifice) होण्यापासून वाचवण्यासाठी 30 वर्षीय विवेक जैन पुढे आला होता. पेशाने सीए असलेल्या विवेकने आणि त्याच्या मित्रमंडळींनी यासाठी 15 लाख उभे केले आहेत.

The Print, च्या वृत्तानुसार, आता हे 124 बकरे चांदनी चौक भागात एकत्र असून त्यांना शांत करण्यासाठी जैन मंत्र लावले जात आहेत. एकाच ठिकाणी सारे बकरे असल्याने त्यांना आपल्याला मारण्यासाठी एकत्र ठेवले जात असल्याच्या भीतीने ते सैरभैर झाल्याचं त्याने म्हटलं आहे. धरमपूर परिसरातील नया जैन मंदिर ईदच्या तोंडावर कसाईपासून वाचवलेल्या बकर्‍यांमुळे गजबजलेलं होतं. चांदणी चौकात राहणाऱ्या जैनांसाठी हा दिवस बकरी दर्शनाचा होता. उधळणाऱ्या बकर्‍यांना पाहण्यसाठी लोकांची गर्दी मंदिरात होत होती. काहींनी त्यांच्या चाऱ्यासाठी पैसे दान केले आहेत.

25 जणांच्या टीमने दिल्लीत कुठल्या भागामध्ये बकर्‍यांची विक्री होते याचा सर्व्हे केला होता. त्यानंतर जैन समजातील मंडळी आपण मुस्लिम आहोत असे भासवून त्यांना खरेदी केले. दरम्यान विवेक जैन याने या बकर्‍यांना, एका सजीव प्राण्याला अत्यंत चूकीच्या पद्धतीने हाताळत असल्याची बाब नमूद केली. बकर्‍यांच्या बाजारात साधारण प्रत्येक बकरा किमान10 हजार या सरासरी किंमतीने विकत घेतला गेल्याचं विवेक सांगतो. का साजरी केली जाते बकरी ईद? जाणून घ्या यामागच्या त्यागाची आणि बलिदानाची कथा.

 

View this post on Instagram

 

A post shared by ThePrint (@theprintindia)

शाकाहारी आणि मांसाहारींमध्ये निष्पाप जीवाला मारून जेवण करणं योग्य की अयोग्य यावर वाद आहे पण अशा परिस्थितीमध्ये विवेक जैन आणि त्याच्य मित्रांनी केलेल्या या गोष्टीचं अनेकांनी कौतुक केले आहे.