Kanpur Encounter Case: विकास दुबे याचा फायनान्सर जय बाजपेयी याला अटक; दोघांच्या बँक खात्यावरुन 75 कोटी रुपयांचे व्यवाहर झाल्याची माहिती
गेल्या एक वर्षभरात विकास दुबे आणि जय बाजपेयी यांच्या बँक खात्यातून तब्बल 75 कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. सांगितले जाते की दोघेही सट्टेबाजीसाठी हा पैसा लावत होते. जय बाजपेयी यांने अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी, मंत्री आणि आमदारांमध्ये मध्यस्थ म्हणूनही काम केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
गँगस्टर विकास दुबे (Vikas Dubey) याचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर (Encounter) केला. त्यामुळे त्याचा खात्मा झाला. हे प्रकरण इथेच थांबले नाही. दुबे याचे धागेदोरे खणून काढण्यास सरुवात झाली आहे. विकास दुबे याला पैसा पुरवणारा फायनान्सर (Financier Of Vikas Dube) , कानपूर (Kanpur) येथील एक व्यापारी जय बाजपेयी (Jai Bajpai याला उत्तर प्रदेश पोलिसांनी रविवारी (20 जुलै) रात्री उशीरा अटक केली. जय बाजपेयी याच्यावर आरोप आहे की, त्याने बिकारु गावात 2/3 जुलैच्या मध्यरात्री झालेल्या 8 पोलिसांच्या हत्या प्रकरणात विकास दुबे आणि त्याच्या हस्तकांना शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरवला होता.
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी मारला गेलेला विकास दुबे याचा एक साथीदार बऊआन दुबे याच्या बहिणीचा पती प्रशांत शुक्ला उर्फ डबलू यालाही अटक केली आहे. त्याच्या मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांना माहिती मिळाली होती की तो बिकारु गावातच आहे. कानपूरचे एसएसपी दिनेश कुमार प्रभू यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, जय बाजपेयी आणि डबलू यांच्यावर शस्त्रास्त्र कायदा आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली भा. द.सं. कलम 120 अन्वये गुन्हा दाखल आहे.
सूत्रांच्या हावाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, 8 पोलिसांच्या घटनेबाबत तपास करणाऱ्या स्पेशल टास्क फोर्स (Special Task Force) अधिकाऱ्यांनाही ही माहिती कळली आहे की, बाजपेयी याने 2/3 जुलैची घटना घडल्यानंतर आरोपींना घटनास्थळावरुन पळून जाण्यास मदत केली होती. त्यासाठी वाहनाचीही व्यवस्था केली होती. दरम्यानच्या काळात कानपूरमध्ये तीन आलीशान कारही आढळून आल्या होत्या. (हेही वाचा, ठाणे: Kanpur Encounter Case मधील विकास दुबे चा साथीदार अरविंद सोबत त्याचा ड्रायव्हरला मुंबईच्या ATS Juhu Unit कडून अटक)
सूत्रांकडून मिळालेली धक्कादायक माहिती अशी की, गेल्या एक वर्षभरात विकास दुबे आणि जय बाजपेयी यांच्या बँक खात्यातून तब्बल 75 कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. सांगितले जाते की दोघेही सट्टेबाजीसाठी हा पैसा लावत होते. जय बाजपेयी यांने अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी, मंत्री आणि आमदारांमध्ये मध्यस्थ म्हणूनही काम केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)