Jack Dorsey on Farmers' Protest: शेतकरी आंदोलनावेळी मोदी सरकारने ट्विटरवर दबाव आणला; ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांचा गौप्यस्फोट

जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी 12 जून रोजी ब्रेकिंग पॉइंट्स या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हे आरोप केले. मुलाखतीदरम्यान, डोर्सी यांना त्यांच्या ट्विटरचे सीईओ असताना परदेशी सरकारांकडून आलेल्या दबावाबद्दल विचारण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

Jack Dorsey | (Photo Credit: Twitter)

शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers' Protest) भारत सरकारने आमच्यावर (Twitter) दबाव आणला होता. शेतकरी आंदोलन सुरु असताना सरकारव टीका करणाऱ्या आणि आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट हटविण्यासाठी भारत सरकारकडून ट्विटरला (Twitter) विनंतीही केली जात होती, असा गौप्यस्फोट ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी (Twitter Co-Founder Jack Dorsey) यांनी केला आहे. डोर्सी यांच्या गौप्यस्फोटामुळे पुन्हा एकदा देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी 12 जून रोजी ब्रेकिंग पॉइंट्स या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हे आरोप केले. मुलाखतीदरम्यान, डोर्सी यांना त्यांच्या ट्विटरचे सीईओ असताना परदेशी सरकारांकडून आलेल्या दबावाबद्दल विचारण्यात आले. या वेळी ते बोलत होते. डोर्सी यांनी पुढे म्हटले आहे की, भारताने ट्विटरवर केवळ दबावच आणला नव्हता. तर, देशातील तुमची कार्यालये बंद करु. तुमच्या कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकू अशा धमक्याही त्यांनी आम्हाला दिल्या. त्यानुसार त्यांनी कारवायाही केल्या, असे डोर्सी म्हणाले. भारतासारख्या लोकशाहीवादी देशात यो गोष्टी होत आहेत हे विशेष, असे डोर्सी यांनी जोर देत म्हटले.

डोर्सी यांनी म्हले आहे की, तुर्कस्तानसुद्धा भारताप्रमाणेच वागले. तुर्की सरकारनेसुद्धा ट्विटर बंद करण्याची धमकी दिली. ज्यामुळे ट्विटरला सरकारविरोधा मोठी लडाई न्यायालयात लढावी लागली आणि ती जिंकली सुद्धा. भारत हा एक असा देश आहे ज्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर टीका करणाऱ्या विशिष्ट पत्रकारांची ट्विटर हँडल बंद करण्यासाठी आम्हाला विनंती केली होती. त्यांनी आम्हाला धमकी दिली आम्ही भारतात ट्विटर बंद करू. आम्ही तुमच्या कर्मचार्‍यांच्या घरांवर छापे टाकू असे म्हटले. त्यांनी ते केलेही, असे डोर्सी यांनी सांगितले. (हेही वाचा, Elon Musk World's Richest Person: एलन मस्क पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती आहे संपत्ती? घ्या जाणून)

ट्विट

व्हिडिओ

शेतकरी आंदोलन सुरु असताना फेब्रुवारी 2021 मध्ये केंद्र सरकारने ट्विटरवरील सुमारे 1200 ट्विटर खाती हटविण्यासा सांगितले होते. त्यासाठी कारण दिले होते की, या खात्यांचा खलिस्तानच्या समर्थकांशी किंवा पाकिस्तानशी संबंध असल्याचा संशय आहे. काही वेळा सरकारने ट्विटरच्या तटस्ततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले, असेही डोर्सी म्हणाले.